Corona Vaccine New Guidelines : तुम्ही कोरोनाबाधित आहात?, मग जाणून घ्या लस कधी घ्यावी!
Corona Vaccine New Guidelines : कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींना लसीकरणासाठी तीन महिन्यांची वाट पाहावी लागेल. आरोग्य मंत्रालयाने नवीन गाईडलाईन्स जारी केल्यात...

Corona Vaccine New Guidelines : कोरोना व्हायरसचा (Corona Virus) वाढता धोका लक्षात घेता केंद्र सरकारने (Central Government) अनेक गाईडलाईन जारी केल्या आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून लसीकरणावर (Corona Vaccination) मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे. अशामध्ये आता सरकारने लसीकरणासंदर्भात नवीन गाईडलाइन्स (Corona Vaccine New Guidelines) जारी केल्या आहेत. या गाईडलाईन्स सर्वांनी जाणून घेणे गरजेचे आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींना लसीकरणासाठी (Vaccination) तीन महिन्यांची वाट पाहावी लागेल.
Also Read:
सर्व राज्य तसेच केंद्र शासित प्रदेशात पाठविण्यात आलेल्या आदेशात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव विकास शील (vikas shil) यांनी म्हटले आहे की, तपासणी दरम्यान ज्या व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले अशाना बरे झाल्यानंतर डोस देण्यात येईल. यासह खबरदारीच्या दृष्टेने आवश्यक ते डोस (Dosage) देखील देण्यात येतील याची अधिकाऱ्यांनी दखल घेण्याची विनंती विकास शील यांनी केला आहे.
ही आहे लस संदर्भात महत्वाची माहिती –
कोरोनाचा वाढता संसर्ग त्यात ओमिक्रोन व्हेरियंटमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी देशात लसीकरणाचा वेग वाढविण्यात आला आहे. यासह कोरोना विषाणूपासून बचाव करण्सायासाठी केंद्र शासनाकडून वेळोवेळी गाईडलाइन्स जारी करण्यात येत आहेत. आता सरकारने लसीकरणासंदर्भात नवीन गाईडलाइन्स जारी केली आली असून लस घेतल्यानंतर किंवा कोरोनातून बरे झाल्यानंतर किती दिवस तुमच्या शरीरात अँटीबॉडीज कायम राहतात ? याबाबत आयसीएमआरचे डीजी बलराम भार्गव (Balram Bhargava) यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, कोरोनाची लागण झाल्यानंतर व्यक्तीच्या शरीरात 9 महिन्यांपर्यत अँटीबॉडीज कायम राहतात. त्यांच्या म्हणण्यानुसार कोरोनाची लागण झाल्यानंतर बरे होणे किंवा व्हॅक्सिनचे दोन्ही डोस घेतल्यानंतर जवळपास 9 महिने व्यक्तीच्या शरीरात इम्युनिटी (Immunity) कायम राहते. भारतात तसेच जागतिक स्तरावर झालेल्या संशाधनानुसार हे स्पष्ट झाले आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या