मुंबई: कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा विपरित परिणाम (Corona Vaccine Side Effects) होत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बहुतांश नागरिक कोरोना लस घेण्याआधी (Corona Vaccination) पेनकिलर (Pain Killer) घेत असल्याचं निदर्शनास आलं आहे. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं (World Health Organization- WHO) मोठा इशारा दिला आहे. दुष्परिणामाच्या भीतीमुळे पेनकिलर घेऊ नका, असा असं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे. लस घेण्याआधीच पेनकिलर घेतल्यास त्याचा विपरित परिणाम लसीच्या प्रभावावर होऊ शकतो, असा इशारा जागतिक संघटनेनं (WHO) दिला आहे.Also Read - Monkeypox Virus : चिंता वाढली! 50 हून अधिक देशांमध्ये पसरला मंकीपॉक्स व्हायरस, WHO ने सांगितले...

कोणतीही कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यास विपरीत परिणाम होऊ शकतात. त्यामुळे लस घेतल्यानंतर अंगदुखी, डोकेदुखी तसेच ताप येणं असा त्रास होऊ शकतो. मात्र, घाबरून जाऊ नका. तुम्ही पॅरासिटामॉल टॅबलेट घेऊ शकतात, असं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे. सध्या सोशल मीडियावर कोरोना लसीकरणाच्या साईड इफेक्टसंदर्भात अनेक अफवा पसरवल्या जात आहे, त्यावर जागतिक संघटनेनं स्पष्टीकरण दिलं आहे. Also Read - Rohit Sharma Tested Covid Positive: इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीपूर्वी कर्णधार रोहित शर्माला कोरोनाची लागण

जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं, की कोरोना लस घेतल्यानंतर कोणतेही साईड इफेक्ट होऊ नये, यासाठी नागरिक आधीच पेनकिलर घेत आहे. मात्र, त्यांनी तसं करू नये. पेनकिलरचा लसीच्या प्रभावावर दुष्परिणाम होऊ शकतो. दरम्यान, लस घेतल्यानंतर त्रास झाल्यास पेनकिलर घेऊ शकतात, असं देखील सांगण्यात आलं आहे. लसीकरणानंतर जाणवणाऱ्या वेदना दूर करण्यासाठी घेतल्यास हरकत नाही. लस घेतल्यानंतर त्याचे सौम्य साईड इफेक्ट्स दिसून येतात. यामध्ये अंगदुखी, डोकेदुखी तसंच ताप असे इफेक्ट दिसून आले आहेत. त्यामुळे या परिणामांवर उपचार करण्यासाठी पेनकिलर किंवा पॅरासिटामॉलचा वापर केला जाऊ शकतो, असं WHO नं स्पष्ट केलं आहे. Also Read - Corona Vaccine for Children: आनंदवार्ता! 7 ते 11 वयोगटातील मुलांचे लवकरच लसीकरण, या लसीच्या वापराला मिळाली मंजुरी

साईड इफेक्ट टाळता येत नाहीत

पेनकिलरचं सेवन केल्यानं कोरोना लसीचे साईड इफेक्ट टाळता येत नाहीत. त्यामुळेच सोशल मीडियावर पसरवल्या जात असलेल्या अफवांवर विश्वास ठेऊ नका. पेनकिलर्स खाऊन लसीकरणास जाणे, हे धोक्याचं ठरु शकतं, असा इशारा देखील WHO नं दिला आहे. पेनकिलरचा लसीवर काय परिणाम होईल, याबाबत अद्याप WHO ने माहिती दिलेली नाही.