New Unlock Guidelines : केंद्र सरकारकडून नव्या अनलॉक गाईडलाईन्स जारी, जाणून घ्या मार्गदर्शक सूचना!
New Unlock Guidelines : केंद्र सरकारने नव्या अनलॉक गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. रुग्णसंख्या आटोक्यात आल्यामुळे इतर व्यवहार देखील सुरळीत व्हावे यासाठी या नव्या मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारने जारी केल्या आहेत.

New Unlock Guidelines : देशामध्ये कोरोनाचा (Corona Virus) प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. नवीन कोरोना रुग्णसंख्या (Corona Patient) आणि मृतांचा आकडा देखील कमी होत चालला आहे. कोरोना रुग्णांचा आकडा कमी होत असल्यामुळे सरकारकडून (Central Government) लागू केलेले अनेक निर्बंध शिथील करण्यात आले होते. अशामध्ये आता देशातील विविध राज्यातील रुग्णसंख्या देखील बऱ्यापैकी नियंत्रणात आली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नव्या अनलॉक गाईडलाईन्स (New Unlock Guidelines) जारी केल्या आहेत. रुग्णसंख्या आटोक्यात आल्यामुळे इतर व्यवहार देखील सुरळीत व्हावे यासाठी या नव्या मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारने जारी केल्या आहेत.
Also Read:
- Scholarship Ban : राज्यातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मोठा धक्का, केंद्र सरकारने 10 लाख विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर आणली बंदी!
- Meta Layoffs : Twitter नंतर आता Facebook ने केली 11,000 कर्मचाऱ्यांची कपात! मार्क झुकरबर्ग मोठा निर्णय..
- Coronavirus Vaccination: भारत हा जगातील महत्त्वाचा लस उत्पादक देश, अमेरिकेकडून भारताचं कौतुक!
केंद्र सरकारने यासंदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना (New guidelines) एका पत्रकाद्वारे जारी करण्यात आल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत आदेश जारी करून, केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला (Union Home Secretary Ajay Bhalla) यांनी या पत्रात राज्यांना आज जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन सुनिश्चित करण्यास सांगितले आहे. सचिवांनी या पत्रात राज्यातील तसंच जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची संख्या पॉझीटिव्हिटी रेट (Positivity Rate) या सर्वांचा विचार करुन राज्यात सूचना जारी करण्यास सांगितल्या आहेत. गृह मंत्रालयाने (Ministry of Home Affairs) जाहीर केलेल्या या सूचनांचा मूळ उद्देश देशातील वेगवेगळे आर्थिक व्यवहार (Financial transactions) सुरळीत करणे हा आहे. कोरोनानंतर परिस्थिती सुधारत असल्यामुळे आता आर्थिक व्यवहारही सुरळीत होणे गरजेचे आहे त्यामुळे सरकारने अनेक गोष्टींवरील निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारने जारी केलेली मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे (Following are the guidelines issued by the government) –
– सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, उत्सव यासह विविध समारंभावरील निर्बंध हटवले जाऊ शकतात.
– शाळा, महाविद्यालये तसंच विविध कोचिंग क्लासेस अशा शैक्षणिक आस्थापनं कोणत्याही निर्बंधाशिवाय सुरु करता येतील.
– रेस्टोरेंट, चित्रपटगृह आणि व्यायाम शाळा इत्यादी आस्थापने सुरु करता येऊ शकतात.
– लग्नसमारंभ तसंच अत्यंसंस्कार विधी इत्यादींवरील निर्बंधही हटवले जाणार आहेत.
– सार्वजनिक वाहतूकींवरील निर्बंध तसंच एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवासासाठीचे निर्बंधही काढण्यात येणार आहेत.
– सरकारी तसेच खासगी कार्यालये कोणत्याही निर्बंधांशिवाय सुरु करता येतील.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या