Corona Virus Third Wave: तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये कोविड-19ची लक्षणं का दिसतात, जाणून घ्या कारण!
Corona Virus Third Wave : कोरोनाच्या तिसर्या लाटेत मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात संसर्ग पसरत आहे. एकीकडे लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत असताना दुसरीकडे कोरोनाचा परिणाम लहान मुलांवरही दिसू लागला आहे.

Corona Virus Third Wave : कोरोना (Corona Virus) महामारीने जगातील सर्वच देशांच्या चिंतेत वाढ केली आहे. कोरोनाने (Covid-19) जगातील अनेक देशांमध्ये आपले हातपाय पसरले आहे. गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जगाच्या चिंतेत वाढ करणाऱ्या कोरोनाची तिसरी लाट (Corona Virus Third Wave) आली असल्याचे म्हटले जात आहे. कोरोनाच्या तिसर्या लाटेत मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात संसर्ग पसरत आहे. एकीकडे लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे (coronavirus symptoms) दिसत असताना दुसरीकडे कोरोनाचा परिणाम लहान मुलांवरही दिसू लागला आहे. 14 जानेवारी 2022 पर्यंत भारतात एकूण 2,64,202 नवीन कोरोना रुग्णांची (Corona Patient) नोंद झाली आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता आता लहान मुलांना देखील लस (Corona Vaccine) देण्यास सुरुवात झाली आहे.
Also Read:
लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरण्यामागचे कारण काय?
संशोधनातून असे दिसून आले आहे की, लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे आणि त्यांना कोरोना होऊ शकत नाही, परंतु मुलांची रोगप्रतिकारक शक्ती देखील कमकुवत असू शकते असा समज लोकांनी केला आहे. दुसरे कारण म्हणजे लहान मुलांना वेगळे ठेवता येत नाही. कारण या वयात त्यांना एकटे सोडणे कठीण आहे. यामुळे त्यांच्या पालकांकडून किंवा काळजीवाहू व्यक्तींकडून संसर्ग प्रसारित होण्याची शक्यता वाढते.
मुलांची कोविड चाचणी कमी का आहे? –
कोरोनाची लक्षणं (coronavirus symptoms) म्हणजे सर्दी. जी सामान्यतः लहान मुलांमध्ये दिसून येते. हवामानातील बदल (Whether Change) किंवा खाण्यापिण्याच्या सवयींमुळे लहान मुलांमध्ये सर्दी आणि तापाची लक्षणं ही नेहमी दिसतात. ज्यामुळे कोरोनाची चाचणी (Corona Test) कधी करावी हे समजणे कठीण होते. त्यामुळे लहान मुलांमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची लक्षणे आणि नमुने समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे.
लहान मुलांची अशी काळजी घ्या –
खोकला, ताप, श्वास घ्यायला त्रास होणे, अंगदुखी, घसा खवखवणे, थकवा आणि नाक वाहणे ही कोरोनाची सामान्य लक्षणे आहेत. ताप हे कोरोनाचे सर्वात सामान्य लक्षण मानले जाते. जर हे लक्षण लहान मुलांमध्ये दिसल्यास त्याची कोरोना चाचणी घेणे आवश्यक आहे. मुलांच्या पालकांनी याबाबत अधिक काळजी घेतली पाहिजे. तुमच्याकडे लहान मूल असल्यास, तुम्ही त्याच्या सुरक्षिततेसाठी कोविड-19च्या सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले पाहिजे. पालकांनी घराबाहेर जाणं टाळावं, नेहमी मास्कचा वापर करावा, घर आणि घराच्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवावा.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या