नवी दिल्ली: देशभरात कोरोनाविषाणूच्या संक्रमणाबाबत (Coronavirus cases In India) दिलासादायक चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या (coronavirus) संख्येत सातत्यानं घट दिसून येत आहे. मृतांची संख्या देखील कमी झाली आहे. दुसरीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला (Third Wave of Coronavirus) हवामानाचा अंदाज समजू नका, अशा शब्दांत केंद्र सरकारनं (Central Government) कोरोनाच्या नियमांच्या उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना इशारा दिला आहे. अशात केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं गेल्या 24 तासांची आकडेवारी जाहीर केली आहे.Also Read - Breaking News Live Updates: मुख्यमंत्री आज सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागांची करणार पाहणी

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 38,792 जणांना कोरोनाची लागण झाली असून 624 जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. तर 41,000 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत देशात 3,01,04,720 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत देशभरात एकूण 4,29,946 रुग्ण एक्टिव्ह आहेत. देशात आतापर्यंत 4,11,408 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. Also Read - Breaking News Live Updates: तिहेरी हत्याकांडमुळे सांगली जिल्हा हादरला, तरुणीवरून दोन गटांमध्ये झालेल्या वादात तिघांची हत्या

दरम्यान, देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लाखो नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर हजारो नागरिकांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहे. त्यात कोरोनाची तिसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नसल्याचा अंदाज केंद्र सरकार आणि एक्सपर्ट्सनी दिला आहे. कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकते, असा देखील इशारा एक्सपर्ट्सकडून देण्यात आला आहे. त्यात कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंट आणि कप्पा व्हेरिएंटच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. राजस्थानमध्ये कप्पा व्हेरिएंटचे 11 रुग्ण आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. Also Read - Breaking News Live Updates: “वेळ आली तर शिवसेना भवनही तोडू” भाजप आमदार प्रसाद लाड यांचं वादग्रस्त वक्तव्य

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला हवामानाचा अंदाज समजू नका-

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा संसर्ग कमी झाल्यानंतर देशभरात अनलॉक (Unlock) प्रक्रिया सुरू झाली आहे. टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनचे (Lockdown) निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. दरम्यान, निर्बंध शिथिल होताच पर्यटन स्थळांवर नागरिक गर्दी करू लागले आहेत. मनाली, मसूरी, शिमला यासह राज्यात देखील महाबळेश्वर, लोणावळा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करत असल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असताना देखील सोशल डिस्टंसिंगच्या निमयांचे उल्लंघन होत आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

यादरम्यान केंद्र सरकारने म्हटले की, देशातील अनेक भागांमध्ये कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होत आहे आणि यामुळे आतापर्यंतचे परिश्रम वाया जाऊ शकतात. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं की, तिसऱ्या लाटेच्या इशाऱ्याला हवामान विभागाचा अंदाज समजू नका. कोरोनाच्या नियमांचे पालन करा. नियम न पाळल्यास भविष्यात मोठी किंमत चुकवावी लागू शकते.