Coronavirus Cases in India: देशभरात एका दिवसात आढळले 1 लाख 59 हजार 632 नवे कोरोनारुग्ण, Omicron देखील पसरला

गेल्या 24 तासांत देशात धडकी भरवणारा कोरोना रुग्णांचा आकडा समोर आला आहे.

Published: January 10, 2022 10:42 AM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Coronavirus, Coronavirus in India, New Corona Cases In India
प्रतीकात्मक तस्वीर

Covid 19 in India: देशभरात कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus Cases in India) तिसऱ्या लाटेचा परिणाम (Third Wave of India) पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत देशात धडकी भरवणारा कोरोना रुग्णांचा आकडा समोर आला आहे. दरम्यान, गेल्या 224 दिवसांतील सर्वाधिक दैनंदिन रुग्णवाढ आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Onion Health Ministry) दिलेल्या अहवालानुसार, 9 जानेवारी रोजी देशभरात 1 लाख 59 हजार 632 नवे कोरोनारुग्ण आढळले आहेत. तर 149 नागरिकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3,57,07,727 वर पोहोचली आहे. तर एकूण मृतांची संख्या 4,83,936 झाली आहे. देशात सध्या 7,23,619 संक्रीय रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 3,45,172 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत.

Also Read:

ओमिक्रॉनचा कहर सुरूच…

देशात ओमिक्रॉनचा संसर्ग (Omicron Cases in India) देखील झपाट्याने पसरला आहे. महाराष्ट्र आणि राजस्थानात ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. देशात ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या 4,033 आहे. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात 1,216 तर राजस्थानात 529 रुग्ण आहेत. देशभरात एकूण 1,552 रुग्णांनी उपचारानंतर ओमिक्रॉनवर मात केली आहे. तर देशात आतापर्यंत 151 कोटी लोकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी बोलावली 5 राज्यांच्या आरोग्यमंत्र्याची बैठक

देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ही बिघडलेली परिस्थिती लक्षात घेता केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सोमवारी पाच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत महाराष्ट्रासह राजस्थान, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश आणि दादरा नगर हवेली आणि दमण आणि दीव हे केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. या बैठकीत कोरोनाशी संबंधित नियमांचे पालन, रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची पुरेशी व्यवस्था आणि तात्पुरत्या रुग्णालयांची व्यवस्था याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जाऊ शकतात.

दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर चिंता व्यक्त केली आहे. पंतप्रधानांनी रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. या बैठकीत पंतप्रधानांनी लोकांना लसीकरण करण्याचे आवाहनही केले. बैठकीत पीएमओच्या अधिकाऱ्यांव्यतिरिक्त गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, कॅबिनेट सचिव राजीव गौबा, गृह सचिव अजय भल्ला, आरोग्य सचिव राजेश भूषण, आयसीएमआरचे संचालक आणि इतर अनेक अधिकारी उपस्थित होते.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 10, 2022 10:42 AM IST