COVID 19 Booster Dose: बूस्टर डोसबाबत केंद्र सरकार करणार फेरविचार; लवकरच घेणार मोठा निर्णय?
COVID 19 Booster Dose: कोरोना लसीचा बूस्टर डोस हेल्थकेअर वर्कर्स, फ्रंटलाइन वर्कर्स आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दिला जातो.

COVID 19 Booster Dose : कोरोना लसीच्या (corona vaccine) बूस्टर डोसबाबत (Booster Dose) तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार केंद्र सरकार (Central government) लवकरच आपल्या धोरणावर पुनर्विचार करण्याची शक्यता आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचा तिसरा डोस विशिष्ट वयोगटांना संरक्षण प्रदान करण्यात अपयशी ठरतेय, असे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविले आहे. सध्या, कोरोना लसीचा बूस्टर डोस हेल्थकेअर वर्कर्स (healthcare workers), फ्रंटलाइन वर्कर्स (frontline workers) आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दिला जातो.
Also Read:
बदलावे लागेल लसीचे धोरण –
एका वेबासाईटच्या वृत्तात नमूद केल्याप्रमाणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते ( according to senior officer) बूस्टर डोसबाबत पुन्हा विचार करावा लागेल. यावेळी काळजीपूर्वक विचार करून धोरणात बदल करत बूस्टर डोसचा पुनर्विचार करावा लागेल. तिसरा डोस देण्यात आलेल्या कोणत्याही देशांमध्ये तो फायदेशीर असल्याचं दिसून आले नाही. त्यामुळे आपण आंधळेपणाने कोणत्याही देशाच्या मार्गावर चालू शकत नाही. आम्हाला आमच्या स्थानिक तज्ज्ञांचं म्हणणं ऐकावं लागेल आणि आमचे निर्णय मूल्यमापनावर आधारित असतील, असंही अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
उच्चस्तरीय बैठकीत झाली चर्चा –
राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गट आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांच्यात मंगळवारी उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीमध्ये बूस्टर डोसवर सविस्तर चर्चा करण्यात आली. काही देशाबाहेरील संशोधनातून (research) असं समोर आलंय की, बूस्टर डोस कोरोना विषाणूपासून संरक्षण देण्यास मदत करतात. मात्र काही अभ्यासांच्या प्राथमिक परिणामांमध्ये असं दिसून आलंय की, तिसऱ्या डोस घेतल्यानंतर काही आठवड्यांत अँटीबॉडीजमध्ये घट होते. त्यामुळे बूस्टर डोसबाबत केंद्र सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या