COVID 19 Booster Dose : बूस्टर डोसच्या नावाखाली फसवणूक; एका मेसेजमुळं रिकामं होऊ शकतं तुमचं अकाऊंट
कोरोना लसीकरणाचा वेग वाढविण्यात आला असून 60 वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस देण्यात येत आहे. मात्र बूस्टर डोसच्या नावाखाली फसवेगिरीचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.

COVID 19 Booster Dose : कोरोनाचा (coronavirus) नवीन प्रकार ओमिक्रॉनच्या (Omicron) रुग्णसंख्येत सतत होणारी वाढ लक्षात घेता सरकारकडून आवश्यक ते कठोर पावलं उचलण्यात येत आहे. लसीकरणाचा वेग वाढविण्यात आला असून 60 वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस (Covid 19 booster Dose) देण्यात येत आहे. मात्र बूस्टर डोसच्या नावाखाली फसवेगिरीचे (fraud) प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.
Also Read:
- Meta Layoffs : Twitter नंतर आता Facebook ने केली 11,000 कर्मचाऱ्यांची कपात! मार्क झुकरबर्ग मोठा निर्णय..
- Corona Virus : कोरोनाची आणखी एक लाट येण्याची शक्यता, WHO च्या शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांचा इशारा
- Corona Update In Maharashtra: चिंता वाढली! राज्यात आढळले कोरोनाचे नवीन 3 विषाणू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
बूस्टर डोसच्या नावाखाली फसवणूक (Covid 19 Booster Dose)
नागरिकांना बूस्टर डोससंदर्भात (Booster Dose) फेक कॉल (Fake call) करण्यात येत असून समोरची व्यक्ती स्वतःला शासकीय कर्मचारी असल्याचे भासवते. या लोकांकडे तुमच्या बद्दलची काही माहीती असते. त्यात ते स्वतः शासकीय कर्मचारी असल्याचे समोरच्या व्यक्तीला पटवून देतात. त्यानंतर ते तुम्हाला नाव, पत्ता, वय यासारखी खाजागी माहिती (Private information) विचारतात. तुम्ही कोविड 19 चा डोस कधी घेतला आहे हे देखील ते सांगतात. तुमचा विश्वास संपादन केल्यानंतर तुम्हाला कोविड 19 बूस्टर डोस संदर्भात माहिती दिली जाते आणि तुम्हाला बूस्टर डोस घ्यायचा आहे की नाही असे विचारतात. तुम्ही हो म्हटले तर बूस्टर डोससाठी तारीख व वेळ सांगण्यात येते. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एका ओटीपी (OTP) येतो. समोरची व्यक्ती तुम्हलाा तो ओटीपी विचारते. त्यानंतर तुम्ही हा ओटीपी दिला तर काही क्षणातच तुमचं अकाऊंट खाली झालेलं असतं.
बूस्टर डोससाठी शासनाकडून कॉल केला जात नाही
या ऑनलाईन फसवणुकीपासून दूर राहायचे असेल तर Covid 19 च्या बूस्टर डोस संदर्भात शासनातर्फे कुठलाही कॉल करण्यात येत नाही हे नागरिकांनी लक्षात ठेवा. बूस्टर डोस घ्यायचा असेल तर नागरिकांना स्वतः लसीचा स्लॉट बुक करावा लागतो. यासाठी तुम्हाला http://cowin.gov.in या वेबसाईटचा किंवा Aarogya Setu ऍपचा वापर करावा लागेल. (COVID 19 Booster Dose: Fraud in the name of Booster Dose; A message can empty your account)
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या