Covid-19 Guidelines : 5 वर्षांखालील मुलांना मास्क अनिर्वाय नाही, केंद्र सरकारकडून नवीन गाईडलाईन्स जारी
Covid-19 Guidelines : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून वारंवार उपाययोजना आखल्या जात आहेत. केंद्र सरकारकडून कोरोनासंदर्भात मार्गदर्शक तत्वे जारी केली जात आहेत

Covid-19 Guidelines : देशामध्ये सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे (Third Wave of Corona) पुन्हा भीती वाढली आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये (Corona Patient) दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यात ओमिक्रॉन व्हेरिएंटने (Omicron Variant) सरकारच्या चिंतेत आणखी वाढ केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून (Central Government) वारंवार उपाययोजना आखल्या जात आहेत. केंद्र सरकारकडून कोरोनासंदर्भात मार्गदर्शक तत्वे (Covid-19 Guidelines) जारी केली जात आहेत. नुकताच केंद्र सरकारने मास्कसंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. केंद्र सरकारने या मार्गदर्शक तत्वांमध्ये असे म्हटले आहे की, कोरोना संसर्गाची तीव्रता असूनही 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना अँटीव्हायरल किंवा मोनोक्लोनल अँटीबॉडीज वापरण्याची शिफारस केलेली नाही. जर स्टिरॉइड्सचा वापर केला जात असेल तर त्यांना सुधारणेच्या आधारावर 10 ते 14 दिवसांमध्ये डोस कमी केला पाहिजे.
Also Read:
- Coronavirus: कोरोनाव्हायरसच्या नव्या व्हेरिएंटचा भारताला किती धोका? ही लक्षणे दिसताच व्हा सावध
- China Corona : चीनने वाढवलं टेंशन, कोरोना रुग्णांचा पुन्हा उद्रेक! हॉस्पिलमध्ये जागाच नाहीत
- Scholarship Ban : राज्यातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मोठा धक्का, केंद्र सरकारने 10 लाख विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर आणली बंदी!
आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) मास्कसंदर्भात जी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत त्यामध्ये असे म्हटले आहे की, ‘मुले आणि किशोरवयीन वयोगटासाठी कोविड-19 च्या व्यवस्थापनासाठी सुधारित व्यापक मार्गदर्शक तत्त्वे’मध्ये असेही म्हटले आहे की, पाच वर्षे आणि त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी मास्कची शिफारस करण्यात आलेली नाही. पण यामध्ये हे देखील सांगितले आहे की, ‘आई-वडिलांच्या देखरेखीत 6 ते 11 वयोगटातील मुले सरिक्षित आणि योग्य पद्धतीने मास्कचा वापर करू शकतात.’
आरोग्य मंत्रालयाने पुढे असे सांगितले आहे की, ’12 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयोगटातील सर्वांनी मास्क वापरला पाहिजे. ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे रुग्णांमध्ये झालेली वाढ लक्षात घेऊन तज्ज्ञांच्या गटाने मार्गदर्शक तत्त्वांचे सुधारणा केलेली आहे.’ मंत्रालयाने सांगितले की, ‘इतर देशांतील उपलब्ध डेटावरून असे दिसून येते की ओमायक्रॉनमुळे होणारा आजार कमी गंभीर आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळजी घणे गरजेचे आहे.’
केंद्र सरकारच्या नवीन गाईडलाईन्स –
– 5 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्क अनिर्वाय नाही.
– 12 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयांची मुलं प्रौढांप्रमाणेच मास्कचा वापर करतील.
– 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना अँटिव्हायरल मोनोक्लोनरल अँटिबॉडीचा सल्ला देण्यात येत नाही.
– कोरोनाच्या माईल्ड केसेसमध्ये स्टेरॉईड्सचा वापर घातक आहे.
– कोरोनासाठी स्टेरॉईड्सचा वापर योग्य वेळी करणं आवश्यक आहे. योग्य डोस देणंही आवश्यक आहे.
– मुलांमध्ये कोणतीही लक्षणं नसली किंवा माईल्ड केस असल्यास त्यांना रूटीन चाईल्ड केअर मिळवणं आवश्यक आहे. जर योग्य असेल तर लसही दिली गेली पाहिजे.
– मुलांना रुग्णालयातून सुट्टी दिल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांचं काऊंसिलिंग केले जावे. त्यांना मुलांची काळजी कशी घ्यावी आणि श्वसनासंबंधी समस्यांबद्दल माहिती दिली जावी.
– कोरोनाच्या उपचारा दरम्यान जर कोणत्याही मुलाच्या शरीराच्या कोणत्याही भागात समस्या आली तर त्यावर योग्य उपचार दिले जावेत.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या