Covid Test New Guidelines: संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करण्याची गरज नाही, केंद्राकडून नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी
देशात कोरोना आणि त्याच्या नवीन 'ओमिक्रॉन' प्रकाराचा वेगाने फैलाव होतोय. गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. कोरोना संसर्गाच्या वेगाला लगाम घालण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सतर्क आहेत.

Covid Test New Guidelines: देशात कोरोना आणि त्याच्या नवीन ‘ओमिक्रॉन’ प्रकाराचा वेगाने फैलाव होतोय. गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. कोरोना संसर्गाच्या वेगाला लगाम घालण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सतर्क आहेत. राज्य सरकारांनी अनेक निर्बंध जाहीर केले असताना आता केंद्र सरकारनेही कोरोना चाचणीसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे (New Covid Testing Guidelines) जारी केले आहेत. त्यानुसार, कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची हाय रिस्क अशी ओळख होत नाही तोपर्यंत त्यांना कोविड चाचणी करण्याची गरज नाही, असे म्हटले आहे.
Also Read:
- Scholarship Ban : राज्यातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मोठा धक्का, केंद्र सरकारने 10 लाख विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर आणली बंदी!
- Corona Virus : कोरोनाची आणखी एक लाट येण्याची शक्यता, WHO च्या शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांचा इशारा
- 8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना लॉटरी! पगारात होणार भरघोस वाढ, वाचा नवीन अपडेट
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच ICMR ने जारी केलेल्या अॅडव्हायझरीमध्ये (New Guidelines) म्हटले आहे की लक्षणे असलेल्या रूग्णांची लवकरात लवकर ओळख करून त्यांना योग्य वेळी आयसोलेशनसह योग्य उपचार दिले जावेत. वृद्ध आणि इतर गंभीर आजारांनी ग्रस्त लोकांमध्ये संसर्गाची ओळख जलद गतीने केली पाहिजे. विशेषत: उच्च रक्तदाब, फुफ्फुस आणि किडनीचे आजार, लठ्ठपणा इत्यादी आजार असलेल्या लोकांची ओळख लवकर केली पाहिजे.
दुसरीकडे केंद्र सरकारने पुन्हा एकदा कोरोनाबाबत इशारा दिला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना पत्र लिहून सांगितले की, सध्या सक्रिय प्रकरणांपैकी केवळ 5 ते 10 टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. मात्र परिस्थिती वेगाने बदलू शकते. गरज भासल्यास कोविड लसीकरण केंद्रे (COVID Vaccination Centres) रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. कोविड लसीकरण केंद्रांची वेळ निश्चित नाही. ते आवश्यकतेनुसार निश्चित केले जाऊ शकते. पायाभूत सुविधा असल्यास रात्री 10 वाजेपर्यंत लसीकरण केंद्रे सुरू करता येतील, असे या पत्रात म्हटले आहे.
In fresh advisory for testing COVID samples, ICMR says contacts of COVID patients do not need testing unless identified as high risk based on age or comorbidities pic.twitter.com/iv3TmH0yHs
— ANI (@ANI) January 10, 2022
सोमवारी देशात कोरोना संसर्गाची 1,79,729 प्रकरणे नोंदवली गेली आणि या दरम्यान 146 जणांना आपला जीव गमवावा लागला. यासह देशात कोरोना संसर्गाची प्रकरणे 3,57,07,727 वर पोहोचली आहेत. देशात आतापर्यंत कोरोनाच्या एकूण मृतांची संख्या 4,83,936 वर पोहोचली आहे. देशात सध्या कोरोनाचे 7,23,619 सक्रिय रुग्ण आहेत.
ओमिक्रॉन संसर्गाची प्रकरणे देखील देशात वेगाने पसरत आहेत. ओमिक्रॉनची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्र, दिल्ली आणि राजस्थानमध्ये नोंदवली जात आहेत. देशात Omicron चे एकूण 4,033 रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 1,216, तर राजस्थानमध्ये 529 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. देशातील ओमिक्रॉनच्या एकूण 4,033 प्रकरणांपैकी 1,552 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या