नवी दिल्ली: 5 वर्षांवरील मुलांच्या कोरोना लसीकरणासंदर्भात (Corona vaccine) मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकन कंपनी फाइझरने (Pfizer) पाच ते 11 वयोगटातील मुलांवरही आपली लस प्रभावी असल्याचे (Vaccine For Children) सांगितले आहे. तसेच यासंदर्भात अमेरिकेची मान्यता घेण्याचा प्रयत्न केला जाईल. असे देखील कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. फायझरचे हे पाऊल मुलांच्या लसीकरणाच्या (children Vaccination) दृष्टीकोणातून अत्यंत महत्त्वाचे आहे.Also Read - Corona Vaccine Update: मुंबईत आज फक्त महिलांनाच मिळणार कोरोना प्रतिबंधक लस!

फायझर आणि त्याचे जर्मन भागीदार बायोनटेक यांनी विकसित केलेली ही लस (Pfizer vaccine for Children) 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी आण प्रौढांसाठी आधीच उपलब्ध आहे. परंतु आता कोरोना साथीच्या रोगाच्या उद्रेकात शाळा सुरू होत असल्याने मुलांचे लसीकरण (Covid19 vaccine) खूप महत्वाचे झाले आहे. मुलांमध्ये डेल्टा विषाणूचा संसर्ग वेगाने पसरतो आणि त्यांच्यासाठी तो धोकादायक असल्याचे देखील काही तज्ञांचे मत आहे. Also Read - Mumbai Local Updates: कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांसाठी आता 'युनिव्हर्सल पास'

एलिमेंटरी/प्राथमिक शाळेत जाणाऱ्या मुलांच्या वयोगटात फायझरने अत्यंत कमी मात्राच्या डोससह परिक्षण केले. ही मात्रा सामान्य डोसच्या तुलनेत केवळ एक तृतीयांश आहे. फायझरचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ बिल ग्रुबर म्हणाले की, “लसीच्या दुसऱ्या डोसनंतर 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाशी लढा देणारी प्रतिपिंडे तेवढीच मजबूत आहेत जेवढी ती किशोरवयीन मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये मजबूत आहेत.” Also Read - TCS, Wipro, Infosys सह अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचे 'Work From Home' केले बंद!

बालरोग तज्ज्ञ असलेले ग्रुबर पुढे म्हणाले की, “मुलांना दिलेला डोस सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यांच्यातही तेच सामान्य ताप, हातात दुखणे असे लक्षणे आढळून आले आहेत जे किशोरवयीन मुलांमध्येही दिसतात. मला वाटते की आम्ही योग्य ठिकाणी पोहोचलो आहोत. कंपनी 5 ते 11 वर्षांच्या मुलांमध्ये लसीच्या आपत्कालीन वापरासाठी अन्न आणि औषध प्रशासनाकडे या महिन्याच्या अखेरीस अर्ज करेल”. लसीच्या वापरासाठी कंपनी युरोपियन आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांना देखील अर्ज करणार असल्याचे त्यांनी सांगितले.