Top Recommended Stories

Credit And Debit Card Rules : RBI ने केले क्रेडिट, डेबिट कार्डच्या नियमात बदल; जाणून घ्या नवे नियम!

Credit And Debit Card Rules : क्रेडिट कार्ड ( Credit Card ) किंवा डेबिट कार्ड ( Debit Card ) बंद करताना कंपनीकडून बार्‍याचदा मनमानी केली जाते. कार्ड बंद करण्यास विलंब होतो. त्यामुळे काहीवेळा ग्राहकांना मोठा दंड देखील भरावा लागतो. ही समस्या लक्षात घेत ग्राहकांच्या विनंतीवरून कंपन्यांना 7 दिवसाच्या कार्ड बंद करणे बंधनकारक आहे. 

Published: April 24, 2022 12:23 PM IST

By India.com News Desk | Edited by Vikas Chavhan

Debit Card

Credit And Debit Card Rules : क्रेडिट (Credit Card) आणि डेबिट कार्ड (Debit Card ) संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. तुम्ही जर क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरत असाल तर ही अपडेट तुमच्यासाठी महत्वाची आहे. भारतीय रिझर्व्ह बँकने ( RBI ) बँक तसेच कंपन्यांसाठी क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड संदर्भात नवीन नियमावली ( RBI New Guidelines ) जारी केली आहे. जारी करण्यात आलेले नियम ( RBI New Rules ) सार्वजनिक क्षेत्रातील Nationalised  बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय ( NBFCS ) संस्थांना बंधनकारक राहतील. राज्य सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि पेमेंट बँकांना ही नवीन मार्गदर्शक तत्वे लागू राहणार नाहीत. नवीन नियम हे 1 जुलै 2022 पासून लागू होणार आहे.

Also Read:

भारतीय रिझर्व्ह बँकेने नवीन नियमावली (RBI New Guidelines ) जारी करत ग्राहकांना दिलासा दिला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कंपन्यांनी क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड जारी केल्यानंतर मनमानी केल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. हे गैरव्यवहार लक्षात घेत आरबीआयने (RBI) पाऊल उचलत नवीन नियमावली जारी केली आहे. क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड बंद करताना कंपनीकडून मनमानी केली जात असल्याच्या तक्रारी आहे. कार्ड बंद करण्यास विलंब होतो. त्यामुळे काहीवेळा ग्राहकांना मोठा दंड देखील भरावा लागतो. ही समस्या लक्षात घेत ग्राहकांच्या विनंतीवरून कंपन्यांना 7 दिवसांत  कार्ड बंद करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास प्रति दिवस 500 रुपये दंड बँकांना द्यावा लागणार आहे.

You may like to read

या आहे नवीन गाईडलाईन

आरबीआयच्या नवीन गाईडलाईननुसार, जर एखाद्या कार्डधारकानं सर्व बिलं भरली तर ग्राहकाच्या विनंतीवरून 7 दिवसांच्या आत बँक किंवा कंपनीला कार्ड बंद करावे लागेल. असे न केल्यास बँकेला ग्राहकांना 7 दिवसानंतर प्रतिदिवस 500 रुपये द्यावे लागतील. यासह क्रेडिट किंवा डेबिट कार्ड बंद झाल्याची माहिती ग्राहकांना एसएमएस आणि ईमेलवर लवकरात लवकर पाठवावी लागेल.

तर बँक स्वतःच क्रेडिट कार्ड बंद करू शकते

आरबीआयच्या  (RBI ) असे ही लक्षात आले की, जर एखाद्या व्यक्तीने एक वर्ष सतत क्रेडिट कार्डाचा वापरच केला नाही तर अशा परिस्थितीत बँक त्यांचे कार्ड बंद करू शकते. मात्र असे करण्याआधी ग्राहकाला माहिती देणे बंधनकारक आहे. मेसेज पाठविल्यानंतर 30 दिवसांच्या आत ग्राहक प्रतिसाद देत नसेल किंवा कार्ड वापरत नसेल तर बँक क्रेडिट कार्ड बंद करू शकते.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: April 24, 2022 12:23 PM IST