नवी दिल्ली : केंद्रीय राखीव पोलिस दलात अधिकारी (CRPF Recruitment 2021) होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. या तरुणांना सीआरपीएफमध्ये (CRPF Recruitment 2021) नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. सीआरपीएफने असिस्टंट कमांडंट (सिव्हिल इंजिनिअर) पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करण्यासाठी (CRPF Recruitment 2021) सीआरपीएफच्या crpf.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करु शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 30 जून 2021 पासून सुरु होणार आहे. तर 29 जुलै ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.Also Read - MahaGenco Recruitment 2022 : पदवीधर उमेदवारांना MahaGenco मध्ये नोकरीची संधी, असा करा अर्ज!

अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर इच्छुक आणि पात्र उमेदवार थेट या लिंकवर https://crpf.gov.in/ जाऊन अर्ज करु शकतात. त्यासोबतच ते http://www.davp.nic.in/WriteReadData/ADS/eng_19140_30_2122b.pdf  या लिंकवर जाऊन अधिकृत अधिसूचना पाहू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 25 पदं भरली जाणार आहेत. Also Read - Government Job: सरकारी नोकरीची सूवर्ण संधी, पगार 80000 रुपये... असा करा अर्ज

सीआरपीएफ भरती 2021 साठी महत्वाची तारीख  (CRPF Recruitment 2021)

अर्ज करण्याची तारीख – 30 जून 2021
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 29 जुलै 2021 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. Also Read - CIC Recruitment 2022: केंद्रीय माहिती आयोगामध्ये 22 पदांसाठी होणार भरती, इच्छुक उमेदवारांनी असा करा अर्ज!

सीआरपीएफ भरती 2021 मधील रिक्त पदांचा तपशील (CRPF Recruitment 2021)

  • असिस्टंट कमांडंट (सिव्हिल इंजिनिअर) – 25 पदे
  • यूआर – 13 पदे
  • ईडब्ल्यूएस – 2 पदे
  • ओबीसी – 6 पदे
  • एससी – 3 पदे
  • एसटी – 1 पद

सीआरपीएफ भरती 2021 साठी शैक्षणिक पात्रता (CRPF Recruitment 2021)

उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पदवीधर असावा.

सीआरपीएफ भरती 2021 साठी वयोमर्यादा (CRPF Recruitment 2021)

उमेदवारांचे वय 35 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तर केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सरकारी सेवेत असलेल्यांना पाच वर्षांची सवलत दिली जाईल.

सीआरपीएफ भरती 2021 ची परीक्षा फी (CRPF Recruitment 2021)

यूआर/ ईडब्ल्यूएस / ओबीसी प्रवर्गातील पुरुष उमेदवारांसाठी अर्ज फी – 400 रुपये
एससी / एसटी / महिला – फी नाही

सीआरपीएफ भरती 2021 मध्ये मिळणारा पगार (CRPF Recruitment 2021)

निवड झालेल्या उमेदवाराला लेव्हल 10 अंतर्गत पगार देण्यात येईल. या उमेदवारांना 56,100 ते 1,17,500 रुपये पगार मिळेल.