CryptoWire Cryptocurrency Index : देशातील पहिला क्रिप्टोकरन्सी निर्देशांक जारी, जाणून घ्या IC15 बाबतचा संपूर्ण तपशील
जगभरात क्रिप्टो चलनाच्या वाढत्या व्याप्ती दरम्यान सुपर अॅप क्रिप्टोवायरने देशातील पहिला क्रिप्टोकरन्सी निर्देशांक IC15 जारी करण्याची घोषणा केली आहे.

CryptoWire Cryptocurrency Index : जगभरात क्रिप्टो चलनाच्या वाढत्या व्याप्ती दरम्यान सुपर अॅप क्रिप्टोवायरने (CryptoWire) देशातील पहिला क्रिप्टोकरन्सी निर्देशांक (Cryptocurrency Index) IC15 जारी करण्याची घोषणा केली आहे. गेल्या काही वर्षांपासून क्रिप्टोकरन्सीज हा एक मालमत्ता पर्याय म्हणून उदयास आला आहे. त्याची स्वीकारार्हता वाढत असल्याने लोकांची त्याबद्दलची उत्सुकता वाढली आहे. आनेक लोक याकडे गुंतवणूकीचा पर्याय म्हणून देखील पाहत आहेत. क्रिप्टोवायरने (Crypto SuperApp) एका निवेदनात म्हटले आहे की हा इंडेक्स जगातील प्रमुख क्रिप्टो बाजारांमधील (crypto markets exchange) सूचीबद्ध व्यापक रुपात ट्रेड करणाऱ्या शीर्ष 15 क्रिप्टोकरन्सीच्या कामगिरीचा मागोवा घेईल आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवेल.
80 टक्क्यांहून अधिक बाजार हालचालींवर ठेवेल लक्ष
क्रिप्टो सुपर अॅप क्रिप्टोवायरने (CryptoWire) सांगितले की हा क्रिप्टोकरन्सी निर्देशांक (Cryptocurrency Index) बाजारातील 80 टक्क्यांहून अधिक हालचालींवर लक्ष ठेवेल. अशा प्रकारे हा निर्देशांक मूलभूतपणे संबंधित बाजाराची वास्तविक परिस्थिती समोर आणेल. त्यामुळे पारदर्शकता आणखी वाढेल. निर्देशांकाची आधारभूत किंमत 10,000 निश्चित करण्यात आली आहे आणि आधारची तारीख 1 एप्रिल 2018 आहे.
निर्देशांक संचालन समितीत तज्ञांचा असेल सहभाग
निवेदनानुसार क्रिप्टोवायची निर्देशांक संचालन समिती प्रत्येक तिमाहीत यात पुनर्संतुलन, देखरेख आणि अंमलबजावणी करेल. या समितीमध्ये संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ, उद्योगाशी संबंधित लोक आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश आहे.
क्रिप्टो इंडेक्स IC15 मध्ये या क्रिप्टोकरन्सीजचा समावेस (Crypto Index IC15 includes these cryptocurrencies)
इंडेक्स IC15 मध्ये बिटकॉइन (Bitcoin), इथेरियम (Ethereum), एक्सआरपी (XRP), लाइटकॉइन (Litecoin), बायनान्स कॉइन (Binance Coin), सोलाना (Solana), टेरा (Terra) आणि चेनलिंक (ChainLink) यांसारख्या क्रिप्टोकरन्सीचा समावेश आहे.
क्रिप्टोकरन्सीचे कठोर मानकं (Strict standards for cryptocurrencies)
जगातील 400 कॉइन्सच्या यादीत समाविष्ट होण्यासाठी क्रिप्टोकरन्सी व्यवसाय किमान 90% होणे आवश्यक आहे. ट्रेडिंग व्हॅल्यूनुसार टॉप 100 चलनांमध्ये स्थान असावे. सर्कुलेटिन्ग मार्केट कॅपिटलायझेशनमध्ये पात्र क्रिप्टोकरन्सी टॉप 50 मध्ये असणे आवश्यक आहे. यानंतर समिती टॉप 15 क्रिप्टोकरन्सीची निवड करेल. निर्देशांकाची मूलभूत किंमत 10,000 निश्चित करण्यात आली आहे आणि मूळ तारीख 1 एप्रिल 2018 आहे.
क्रिप्टोकरन्सी टोकनच्या स्वरूपात नियंत्रित केली जाऊ शकते – आरबीआयच्या समिती
काही दिवसांपूर्वी क्रिप्टोकरन्सीच्या प्रश्नावर रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समिती एमपीसीच्या (MPC) सदस्याने याला ‘क्रिप्टो-टोकन्स’ म्हणणे अधिक योग्य ठरेल असे सांगितले होते. तसेच, क्रिप्टोकरन्सीला चलन म्हणून स्वीकार्य मानले जाऊ शकत नाही. चलन म्हणून त्यांच्या वापरावर बंदी घातली पाहिजे, परंतु टोकन स्वरूपात त्यांचे नियमन केले जाऊ शकते, असे त्यांनी अधोरेखित केले होते.
हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी म्हटले होते की सर्व लोकशाही देशांनी क्रिप्टोकरन्सीवर एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे आणि ते चुकीच्या हातात पडणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. आभासी चलनाचे उदाहरण देताना मोदी म्हणाले, “उदाहरणार्थ क्रिप्टोकरन्सी किंवा बिटकॉईन घ्या. सर्व देशांनी यावर एकत्रितपणे काम करणे आणि ते चुकीच्या हातात पडणार नाही याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे, त्यामुळे आपली तरुणाईचे नुकसान होऊ शकते.”
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या