Top Recommended Stories

CUET 2022 Update: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! सीयूईटीची अधिसूचना जारी, 2 एप्रिलपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया

यंदा अंडर ग्रॅज्युएट कोर्ससाठी (UG admission 2022-23) विद्यार्थ्यांना कॉमन यूनिव्हर्स‍िटी एंट्रेंस टेस्‍ट (CUET 2022) द्यावी लागणार आहे. नॅशनल टेस्‍ट‍िंग एजन्सीने (NTA) ही परीक्षा आयोजित केली आहे.

Updated: March 27, 2022 3:38 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

CUET 2022 Update: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! सीयूईटीची अधिसूचना जारी, 2 एप्रिलपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया

CUET 2022: यंदा अंडर ग्रॅज्युएट कोर्ससाठी (UG admission 2022-23) विद्यार्थ्यांना कॉमन यूनिव्हर्स‍िटी एंट्रेंस टेस्‍ट (CUET 2022) द्यावी लागणार आहे. नॅशनल टेस्‍ट‍िंग एजन्सीने (NTA) ही परीक्षा आयोजित केली आहे. CUET ची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अर्ज प्रक्र‍िया 2 एप्रिलपासून सुरू होणार आहे. अर्ज करण्यासाठी (CUET Application form 2022) विद्यार्थी अधिकृत वेबसाइटला samarth.edu.in भेट देऊन अधिक माहिती घेऊ शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल आहे.

ही परीक्षा (CUET-UG 2022 ) कॉम्प्युटर आधारित (CBT) आहे. CUET (UG) 2022 मध्ये चार सेक्‍शन आहे.
तसेच यंदा महाविद्यालयात प्रवेशासाठी 12 वीत किती गुण मिळाले, याला काही किंमत नसणार आहे. तर Common University Entrance Test (CUET) चा स्कोअर गृहीत धरला जाणार आहे. याचा अर्थ असा, की विद्यापीठांमधील पदवीपूर्व अभ्यासक्रमांचे प्रवेश आता पूर्णपणे CUET गुणांच्या आधारे होतील, असे विद्यापीठ अनुदान आयोगाने ( University Grants Commission-UGC) स्पष्ट केले आहे.

You may like to read

पहिले सेक्‍शन- IA : भाषा ( वेगवेगळ्या 13 भाषा असणार. विद्यार्थी कोणतीही एक भाषा निवडू शकतात.)

पहिल्या सेक्सनचा दुसरा भाग– IB: 19 भाषा ( पहिल्या सेक्‍शनशिवाय आणखी 19 भाषा असतात. यात देखील तुम्ही भाषेची निवड करू शकतात.)

दूसरे सेक्‍शन – II: 27 डोमेनवर आधारित विषय (एकूण 27 डोमेन आधारित विषय असतील, विद्यार्थी जास्तीत जास्त 6 डोमेन निवडू शकतात)

तिसरे सेक्‍शन- III: जनरल टेस्‍ट

संबंधित तपशीलवार माहिती मिळविण्यासाठी उमेदवारांना NTA CUET (UG)-2022 च्या cuet.samarth.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट देण्याचा सल्ला दिला जातो.

याशिवाय, ते NTA हेल्पलाइन क्रमांक (NTA Helpline number) 011-40759000 किंवा 011-6922 7700 किंवा ईमेल आयडी cuet-ug@nta.ac.in वर संपर्क करू शकतात.

उमेदवार https://nta.ac.in/Download/Notice/Notice_20220327095145.pdf या थेट लिंकवर क्लिक करून अधिसूचना तपासू शकतात.

CUET (UG) 2022 मध्ये  कसे असतील प्रश्न

सर्व प्रश्न बारावीचे असतील. CUET (UG) 2022 च्या परीक्षेत बसण्यासाठी, विद्यार्थी बोर्डाच्या अभ्यासक्रमाचे अनुसरण करू शकतात आणि त्यावर आधारित तयारी करू शकतात.

CUET (UG) 2022 किती वेळा देऊ शकतो?

एखाद्या विद्यापीठाने मागील वर्षाच्या विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक सत्रात प्रवेश देण्यास सहमती दिली तर विद्यार्थी CUET (UG) 2022 च्या परीक्षेला बसू शकतात.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.