मेष: (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांना आज कुटुंबीयांकडून सहकार्य मिळणार आहे. आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी त्यांना एकप्रकारे बळ मिळणार आहे. मात्र, कामावरून लक्ष विचलित होऊ देऊ नका. नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.Also Read - Rashi Bhavishya in Marathi Today, 25 June : या राशीची लोकं नोकरी मिळवण्यात यशस्वी होतील, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य!

वृषभ: (Taurus Horoscope)

वृषभ राशीचे लोक नवा उद्योग- व्यवसाय सुरू करू शकतात. परंतु, कोणताही महत्त्वाचा निर्णय घाई गडबडीत घेऊ नका. मोठी जबाबदारी शक्यतो आज टाळाच. Also Read - Rashi Bhavishya in Marathi Today, 24 June : या राशीच्या लोकांच्या नोकरीत प्रगती आहे, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य!

मिथुन: (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांकडून आज अप्रत्यक्षरित्या इतरांना मदत होईल. ते गरजू व्यक्तीला आर्थिक मदत करू शकतील. आपल्या कौशल्याच्या जोरावर वरिष्ठांची मनं जिंकून घ्याल. Also Read - Rashi Bhavishya in Marathi Today, 23 June: या राशीच्या लोकांना सायंकाळपर्यंत शुभ संकेत मिळतील, यश-कीर्ती लाभेल , जाणून घ्या तुमचे राशीभविष्य!

कर्क: (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांना आजचा दिवस त्रासदायक ठरू शकतो. आरोग्याची समस्या राहील. प्रिय व्यक्तीच्या गाठीभेटी होण्याची शक्यता आहे.

सिंह: (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांना कामानिमित्त प्रवास करावा लागेल. कामाच्या विनाकारण कोणाशी वाद घालू नका. कामावरून लक्ष विचलीत होण्याची शक्यता आहे.

कन्या: (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा ठरणार आहे. मिळकत चांगली राहील, पण खर्च देखील तसाच होईल. जुना आजारातून आज सुटका होण्याची शक्यता आहे.

तूळ: (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांना आज जोडीदाराचं महत्त्व पटणार आहे. जीवनसाथीसोबत जास्त वेळ घालवाल. प्रत्येक नवी गोष्ट करताना जोडीदाराचा सल्ला घेण्याचा आज संकल्प करू शकतात.

वृश्चिक: (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांना नवी मालमत्ता खरेदी करण्याचे पर्याय सापडतील. भविष्यातील संभाव्य आर्थिक संकट टाळण्यासाठी आतापासूनच खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.

धनु: (Sagittarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांना फिटनेससाठी केलेल्या परिश्रमाचं फळ मिळेल. जोडीदारासोबत विकेंड ट्रिपचं नियोजन कराल.

मकर: (Capricorn Horoscope)

मकर राशीचे लोकांना प्रिय व्यक्ती भेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. रोमांटिक आठवणींना उजाळा मिळेल. घर कामात जोडीदाराला मदत करण्याचा विचार डोक्यात येईल.

कुंभ: (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. जुन्या आजारातून मुक्तता मिळण्याचे संकेत मिळतील. अनपेक्षीत लाभ होण्याची शक्यता आहे.

मीन: (Pisces Horoscope)

मीन राशीच्या लोकांना असं जाणवेल, की त्याच्या आयुष्यात असं प्रेम कधीही नव्हतं. कुटुंबातील सर्व सदस्यांसोबत एका मंगलकार्यात सहभागी व्हाल.