मेष: (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास आहे. नवीन उपक्रम सुरू करू शकतात. तुमच्या कामाला कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. लवकरच विदेशवारीचं स्वप्न पूर्ण करू शकाल.Also Read - Rashi Bhavishya in Marathi Today, 25 June : या राशीची लोकं नोकरी मिळवण्यात यशस्वी होतील, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य!

वृषभ: (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस मस्त जाईल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. आर्थिक समस्या देखील सुटतील. घरात आनंदाचं वातावरण राहील. Also Read - Rashi Bhavishya in Marathi Today, 24 June : या राशीच्या लोकांच्या नोकरीत प्रगती आहे, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य!

मिथुन: (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांना नोकरी-व्यवसायात निष्काळजीपणा करून चालणार नाही. कामावर फोकस करा. वरिष्ठांचं लक्ष तुमच्यावर हे लक्षात असू द्या. Also Read - Rashi Bhavishya in Marathi Today, 23 June: या राशीच्या लोकांना सायंकाळपर्यंत शुभ संकेत मिळतील, यश-कीर्ती लाभेल , जाणून घ्या तुमचे राशीभविष्य!

कर्क: (Cancer Horoscope)

कर्क राशीचे लोक आरोग्याशी संबंधित किरकोळ समस्यांपासून आज मुक्त होणार आहेत. काही चमचमीत खाण्याची इच्छा होईल. शांत झोप लागेल.

सिंह: (Leo Horoscope)

सिंह राशीचे लोक लवकरच मोठी गुंतवणूक करू शकता. घर किंवा दुकान खरेदी करण्यासाठी कुटुंबातील सदस्यांकडून सहकार्य मिळेल.

कन्या: (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांना आज सामाजिक प्रतिष्ठा मिळेल. आधी केलेल्या गुंतवणुकीचं चांगलं फळ मिळेल.

तूळ: (Libra Horoscope)

तूळ राशीचे लोकांना लाईफस्टाईलमध्ये बदल करण्याची इच्छा होईल. मात्र, जुन्या सवयी सोडण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

वृश्चिक: (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांना जोडीदाराकडून सरप्राईज मिळेल. कुटुंबाला पुरेसा वेळ द्याल. घरात आंनदाचं वातावरण राहील.

धनु: (Sagittarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांचा आजचा दिवस आनंदात जाणार आहे. घरात एका मंगलकार्याचं आयोजन करण्यात येईल. मित्रमंडळी, नातेवाईक एकत्र येऊ शकतात.

मकर: (Capricorn Horoscope)

मकर राशीचे लोकांना आज आनंदवार्ता समजेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. सामाजिक प्रतिष्ठा मिळेल. नव्या गाठी भेटी होतील.

कुंभ: (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांना आजचा दिवस तसा वाईट जाण्याची शक्यता आहे. तनावपूर्ण परिस्थितीचा सामना करण्याची तयारी ठेवा. एकादा चांगला संकल्प करू शकतात.

मीन: (Pisces Horoscope)

मीन राशीच्या लोकांना नोकरीत यश मिळेल. पण व्यापारात नुकसान होण्याची शक्यता आहे. आर्थिक अडचणी दूर होण्यास वेळ लागेल.