आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल, हे जाणून घ्या पंडित जगन्नाथ गुरुजींकडून…Also Read - Rashi Bhavishya in Marathi Today, 29 June : कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगतात ग्रह-तारे? जाणून घ्या तुमचे राशीभविष्य!

मेष: (Aries Horoscope)

मेष राशीचे लोक जेवढी कमाई करत आहेत, त्यापेक्षा जास्त खर्च करतील. यांच्याकडे नोकरीची एखादी नवी संधी चालून येण्याची शक्यता आहे. ही संधी त्यांचं आयुष्य बदलून टाकेल. Also Read - Mahindra Scorpio-N : महिंद्राने केली नवीन स्कॉर्पिओ-एन लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

वृषभ: (Taurus Horoscope)

वृषभ राशिचे लोक आज बहुप्रतिक्षित कौटुंबिक स्नेहसम्मेलनाचा आनंद लूटतील. या राशिचे लोक आपला व्यवसाय मजा मस्तीसह करण्याच्या पद्धतींचा शोध घेतील. Also Read - Rashi Bhavishya in Marathi Today, 28 June : या राशीच्या लोकांच्या नोकरीतील अडचणी दूर होतील, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य!

मिथुन: (Gemini Horoscope)

मिथुन राशीचे लोक अखेर आपल्या आवडीची मालमत्ता खरेदी करण्यात यशस्वी होतील. शिक्षण क्षेत्रातील लोक परिस्थिती आपल्या बाजूने बदलताना पाहू शकतात.

कर्क: (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांनी आपल्या संपूर्ण दिनचर्येचं काटेकोरपणे पालन करणे अत्यंत आवश्यक असेल. अन्यथा याचा त्यांच्या आरोग्यावर काही प्रमाणात नकारात्मक प्रभाव पडू शकतो.

सिंह: (Leo Horoscope)

सिंह राशीचे लोकांची त्यांची पत्नी किंवा आईला घरगुती कार्यात मदत करण्याची इच्छा होईल. इतरांच्या गरजा समजून घेतल्याबद्दल त्याचे कौतुक होईल.

कन्या: (Virgo Horoscope)

कन्या राशीचे लोक लोक नवीन कल्पना वापरण्याची वाट पहात होते, आता ते कोणत्याही अडचणीशिवाय असं करू शकतात. त्यांनी कोणतेही अतिरिक्त काम हातात घेऊ नये.

तूळ: (Libra Horoscope)

आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवल्याबद्दल तूळ राशीच्या लोकांचं कौतुक होईल. ते त्यांच्या मुलांसाठी एखादी भेटवस्तू खरेदी करू शकतात.

वृश्चिक: (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीचे लोक आपला प्रियकर/प्रेयसीसोबत संध्याकाळी फिरण्यासाठी जाऊ शकतात. नजीकच्या काळात ते मित्रांसह प्रवास करण्याची योजना देखील आखू शकतात.

धनु: (Sagittarius Horoscope)

धनु राशीचे लोक इतरांनी दिलेल्या व्यर्थ सल्ल्याचं पालन करणार नाहीत. ते त्यांच्या मार्गावर चालण्यावर विश्वास ठेवतील.

मकर: (Capricorn Horoscope)

मकर राशीचे लोक आर्थिक स्थितीत सुरक्षित असतील. नजीकच्या काळात काही लोकांच्या व्यवसायात वाढ होण्याचीही शक्यता आहे.

कुंभ: (Aquarius Horoscope)

कौटुंबिक आघाडीवर काही मुद्द्यांवरून कुंभ राशीच्या लोकांची मनशांती भंग होईल. त्यांनी आपल्या जोडीदारास भेटवस्तू देण्याचा विचार केला पाहिजे.

मीन: (Pisces Horoscope)

मीन राशीचे लोक त्यांच्या नात्याशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घेणे टाळतील. त्यांची एका जुन्या मित्राशी असलेले मतभेदही दूर करण्याची इच्छा असेल.