आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल, हे जाणून घ्या पंडित जगन्नाथ गुरुजींकडून…Also Read - Daily Rashi Bhavishya in Marathi Today 2 August 2021: या राशीच्या लोकांचा पैशांचा प्रश्न सुटण्याची शक्यता; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा?

मेष: (Aries Horoscope)

मेष राशीचे लोक स्मार्ट नेटवर्किंगच्या मदतीने आपल्या महत्त्वकांक्षी प्रकल्पांसाठी निधी जमा करण्यास सक्षम राहतील. कार्यस्थळावरील सर्व गोष्टीवर आपले नियंत्रण राहणार नाही. Also Read - Daily Rashi Bhavishya in Marathi Today 1 August 2021: कन्या राशीच्या लोकांनी संपत्तीबाबत सतर्कता बाळगावी; जाणून घ्या तुमची रास आज काय सांगते?

वृषभ: (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांना आपले प्रलंबित कार्य पूर्ण करण्यासाठी शक्य ते संपूर्ण प्रयत्न करण्याची गरज असेल. आरोग्याशी संबंधीत छोट्या-मोठ्या बाबींवरून त्यांनी चिंतत होऊ नये. Also Read - Daily Rashi Bhavishya in Marathi Today 31 July 2021: या राशीच्या लोकांनी घाईगडबडीत निर्णय घेऊ नये, आर्थिक नुकसान होवू शकते, जाणून घ्या आजचं राशीभविष्य

मिथुन: (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांना आपल्या जोडीदाराकडून प्रशंसा मिळेल. यांनी केलेल्या प्रयत्नांना अखेर लोक ओळखू लागले आहेत आणि त्यांची प्रशंसा देखील होत आहे.

कर्क: (Cancer Horoscope)

कर्क राशीचे जे लोक प्रवास करत आहेत त्यांच्या मार्गात कोणतीही अडचण येणार नाही. यांना लवकरच स्वतःची कार किंवा स्कूटर खरेदी करण्याची संधी मिळू शकेल.

सिंह: (Leo Horoscope)

सिंह राशीचे ज्या लोकांना जोडीदाराची आवश्यकता भासत आहे, कदाचित त्यांना आज आज पहिल्या प्रेमासारखी अनुभूती येऊ शकते. त्यांनी त्यांच्या भावना रोखू नयेत आणि त्वरित त्या बाबतीत स्पष्ट बोलणे आवश्यक आहे.

कन्या: (Virgo Horoscope)

कन्या राशीचे लोक कार्यालयात अतिरिक्त काम करण्यास तयार असतील. वेळेच्या कमतरतेमुळे त्यांना आपल्या कुटुंबातील सदस्यांचा राग सहन करावा लागू शकतो.

तूळ: (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांना आज याची जाणीव होईल की, त्यांच्या आयुष्यात जे काही घडत आहे त्यात त्यांचे हित आहे. संवेदनशील विषयांवर अंतिम निर्णय घेण्यापूर्वी यांनी प्रतिक्षा केली पाहिजे.

वृश्चिक: (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीचे जे लोक कामाच्या गतीमुळे निराश होत आहेत, त्यांना गोष्टी त्यांच्या हातात घेण्याची आवश्यकता आहे. यांनी संतप्त होण्याऐवजी कामावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

धनु: (Sagittarius Horoscope)

धनु राशीचे लोक अचानक एखाद्या अशा व्यक्तिसमोर येऊ शकतात, जी त्यांना मनातल्या मनात आवडते. हे लोक त्यांच्या जीवनशैलीत काही खूप सकारात्मक बदल करु शकतात.

मकर: (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांच्या खांद्यावर कामाच्या ठिकाणी आधीपासून खूप साऱ्या जबाबदाऱ्या आलेल्या असतील. ते आज त्यांच्या सामाजिक वर्तुळात पूर्णपणे वर्चस्व गाजवतील.

कुंभ: (Aquarius Horoscope)

कुंभ राशीचे लोक एखादी पार्टी आयोजित करण्याचा विचार करतील. जर पार्टी करणे शक्य नसेल तर ते सहलीवर जाण्याचा विचार करतील.

मीन: (Pisces Horoscope)

मीन राशीच्या लोकांना असे जाणवेल की कुटुंबातील सदस्यांसोबत असलेल्या सामंजस्यामुळं घरात शांती राहते. त्यांच्या नात्यात सर्वोतोपरी परस्पर आदर राहील.