मेष: (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांना आज आपल्या शक्तीचा योग्य वापर करावा लागेल. एक लक्ष्य निश्चित करावं लागेल. वेळ अमुल्य आहे. त्याचं महत्त्व ओळखून वेळेचा सदुपयोग करावा.Also Read - Rashi Bhavishya in Marathi Today, 25 June : या राशीची लोकं नोकरी मिळवण्यात यशस्वी होतील, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य!

वृषभ: (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आत्मचिंतन करण्याचा आहे. आपल्या अनुभवाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी करू शकतात. Also Read - Rashi Bhavishya in Marathi Today, 24 June : या राशीच्या लोकांच्या नोकरीत प्रगती आहे, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य!

मिथुन: (Gemini Horoscope)

कोणाशी भांडण होत असेल तर मिथुन राशीच्या लोकांना एक पाऊल मागे घेतलेलंच बरं. या वादावर कायमचा उपाय शोधावा लागेल. Also Read - Rashi Bhavishya in Marathi Today, 23 June: या राशीच्या लोकांना सायंकाळपर्यंत शुभ संकेत मिळतील, यश-कीर्ती लाभेल , जाणून घ्या तुमचे राशीभविष्य!

कर्क: (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांना आज त्यांच्या अंतर्गत भावनेचं पाठबळ मिळेल. प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील.

सिंह: (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांना आजचा दिवस उत्तम आहे. जे काम करताना भीती वाटत होती, तेच काम आज मोठ्या ध्यैर्यानं पूर्ण करतील. स्वत: मधील क्षमता ओळखा.

कन्या: (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. मार्गातील अडचणी दूर करण्यास प्राथमिकता द्यावी लागेल. असं करताना इतरांचं अनुसरण करणं, परवडणार नाही.

तूळ: (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांना आज वेगळा अनुभव येईल. इतर लोक नाही तर आपणच आपल्या प्रगतीसाठी अडथळा निर्माण करत असल्याचं जाणवेल. आत्मपरीक्षण करून त्यावर मार्ग शोधावा लागेल.

वृश्चिक: (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांनी आज वाद टाळलेलाच बरा. कायदा- नियम माहित असून देखील संयम ठेवावा लागेल. भावनांमध्ये वाहून जावू नये.

धनु: (Sagittarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांची आज चांगलीच कसोटी लागणार आहे. भावनांना आवर घालावा लागेल. संयम राखावा लागेल. एखादा निर्णय घेताना इतरांचा सल्ला घ्या.

मकर: (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांना आज आधी केलेल्या चुकांचा फटका बसण्याची शक्यता आहे. यापुढे विचारपूर्वक कार्य करावं लागेल.

कुंभ: (Aquarius Horoscope)

कुंभ राशीचे लोकांना आजचा दिवस उत्तम आहे. प्रियजनांमधील गैरसमज दूर होतील. घरात देखील आनंदाचं वातावरण राहील.

मीन: (Pisces Horoscope)

मीन राशीच्या लोकांची कसोटी पाहाणार आजचा दिवस आहे. भावनांमध्ये वाहून जाऊ नका. प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात, याची जाणीव होईल.