नवी दिल्ली: तुम्ही मद्यप्रेमी असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. देशाची राजधानी दिल्लीत आता पुढील 47 दिवस वाईन शॉप (Delhi Liquor Shops Closed) बंद राहणार आहे. येत्या 1 ऑक्टोबरपासून शहरातील सर्व दारुची दुकानं बंद राहतील. दिल्ली सरकार (Delhi Government) नोव्हेंबरमध्ये नवीन अबकारी धोरणाची अंमलबजावणी करणार आहे. त्यामुळे दिल्लीतील खासगी दारूची दुकानं (Liquor Shops) 47 दिवस बंद राहणार आहेत.Also Read - Aryan khan नंतर Ananya Pandey च्या अडचणीत वाढ! चॅटमधून झाला धक्कादायक खुलासा

सरकारी सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दिल्लीच्या 272 नगरपालिका वार्डापैकी 105 वार्डातील दारुची दुकानं 1 ऑक्टोबर ते 16 नोव्हेंबरदरम्यान बंद राहतील. विशेष म्हणजे या काळात केवळ सरकारी दारुची दुकानं सुरू राहतील. दिल्ली शहरात एकूण 849 दारुची दुकानं आहेत. त्यात 276 खासगी तत्वावर चालवली जातात. याचा अर्थ असा की, 1 ऑक्टोबरपासून दिल्लीत 276 खासगी दारुची दुकानं बंद राहणार आहेत.
Delhi Liquor ShopsAlso Read - शुभमंगल सावधान! मराठमोळा अभिनेता सुयश टिळक अडकला लग्नाच्या बेडीत! पाहा Photo

दिल्ली सरकारनुसार, शहरातील खासगी दारूची दुकानं ताब्यात घेण्यासाठी नवीन बोली लावण्यात आली होती. याचा अर्थ असा की ज्यांच्याकडे आधीपासून दारू विक्रीचा परवाना (liquor sale license) आहे. मात्र, बोली लावण्यात ते अपयशी ठरले तर तर त्यांना आपली दुकाने सोडावी लागतील. नंतर ही दुकानं परवाना मिळालेल्या लोकांना चालवण्यासाठी दिले जातील. 1 ऑक्टोबरपासून दुकाने बंद राहतील. या पार्श्वभूमीवर अनेक खासगी दारू दुकान मालकांनी नवीन स्टॉक खरेदी करणे आधीच बंद केले आहे. Also Read - 7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाली गिफ्ट! महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ, जाणून घ्या किती वाढेल पगार

राजधानीत मद्य खरेदी करणाऱ्यांना सुविधा मिळवून देण्याचा या नवीन धोरणाचा उद्देश आहे. मद्य खरेदी करणारा दुकानाच्या आत जाऊन दारू स्वतः पाहू शकतील, अशी रचना दुकानदारांना करावी लागेल.
Delhi Liquor Shops Closed

दिल्ली सरकारनं मद्यविक्रेत्यासाठी 2021-2022 या वर्षासाठी नवीन अबकारी धोरण ठरवलं आहे. दिल्लीतील बनावट दारू संपवणे आणि ग्राहकांना सुविधा उपलब्ध करून देणे. तसेच सरकारला मोठा महसूल मिळवणे, हा या मागील मूळ उद्देश आहे.