नवी दिल्ली: पूर्व दिल्लीतील (Delhi) शाहदरा भागात सिलिंडरचा स्फोट (cylinder blast) होऊन लागलेल्या भीषण आगीत चौघांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी तात्काळ हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे. शाहदरा भागातील फर्श बाजारात (Farsh Bazar area of Shahdara) मंगळवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.Also Read - Union Minister Dr. Bhagwat Karad यांनी प्रोटोकॉल मोडून वाचवले फोटोग्राफरचे प्राण, पाहा VIDEO

वृत्तसंस्था ‘एएनआय’ला अग्निशमन विभागाचे व्यवस्थापक अतुल गर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहदरा भागातील फर्श बाजारात सिलिंडरचा स्फोट होऊन भीषण आग पसरली. आगीची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन विभागाचे जवान तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आणून 5 जणांना वाचविण्यात जवानांना यश मिळालं. पण तोपर्यत चौघांचा होरपळून मृत्यू झाला. पोलिसांनी घटनेची चौकशी सुरू केली आहे. Also Read - Viral Video: फिल्मी स्टाईल स्टंट करणं पडलं महागात, तीन गाड्यांसह तरुणाला अटक!

Also Read - Navneet Rana Challenge To CM : नवनीत राणांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा चँलेज, म्हणाल्या 'इतकी ताकद आहे तर...'

दरम्यान, दक्षिण-पूर्व दिल्लीच्या तुगलकाबाद एक्सटेंशन भागात देखील मंगळवार सायंकाळी आगीची घटना घडली होती. पोलिसांनी माहिती दिली की, सिलिंडरच्या दुकानात ही आग लागली होती. सुदैवानं या घटनात कोणतीही हानी झाली नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या जवानांनी तातडीनं घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवलं.