नवी दिल्ली: देशभरात कोरोनाव्हायरसची दुसरी लाट (Coronavirus Second Wave) ओसरत असताना आणखी एक चिंताजनक बाब समोर आली आहे. महाराष्ट्रासह (Maharashtra) केरळ (Kerala) आणि मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) कोरोनाव्हायरसचा न्यू म्यूटेशन म्हणजेच डेल्टा प्लस विषाणूचा (Delta Plus Variant) संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महाराष्ट्रात डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेले 21 रुग्ण आढळून आले आहे. ही परिस्थिती लक्षात घेता केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं महाराष्ट्रासह केरळ आणि मध्य प्रदेशात अलर्ट जारी केलं आहेत.Also Read - Rohit Sharma Tested Covid Positive: इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीपूर्वी कर्णधार रोहित शर्माला कोरोनाची लागण

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं डेल्टा प्लस विषाणूला (Delta Plus Variant) ‘व्हेरिएंट ऑफ कंसर्न’ (Variant of Concern) म्हणजे कोरोनाचा चिंताजनक प्रकार म्हणून घोषित केला आहे. SARS-CoV-2 जिनोमिक कंसोर्टिया निष्कर्षांच्या आधारावर महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. Also Read - Viral Video : ट्रेनला लटकून स्टंट करणं पडलं महागात, खांबाला धडकून तरुण गंभीर जखमी!

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले, ‘डेल्टा प्लस व्हेरिएंट’ आतापर्यंत भारतासह जगभरातील 80 देशांमध्ये आढळून आला आहे. त्यात अमेरिका, ब्रिटन, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड, जापान, पोलंड, नेपाळ, चीन आणि रशियाचा समावेश आहे. कोरोनाचा हा नवा प्रकार असून तो अत्यंत धोकादायक आहे. महाराष्ट्रात डेल्टाचा धोका दिवसेंदिवस वाढतो आहे. Also Read - Plastic Ban In Mumbai : मुंबईकरांनो 1 जुलैपासून पुन्हा प्लास्टिक बंदी, अन्यथा होईल कारवाई!

महाराष्ट्रातील रत्नागिरीत (Ratnagiri) सर्वाधिक नऊ रुग्ण तर जळगाव (Jalgaon) येथे सात रुग्ण आहेत. मुंबई (Mumbai) दोन आणि पालघर (Palghar), सिंधुदुर्ग (Sindhudurg), ठाणे (Thane) येथील प्रत्येकी एक रुग्ण आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Maharashtra Health Minister Rajesh Tope) यांनी दिली. त्याचबरोबर केरळ आणि मध्य प्रदेशात देखील डेल्टाचे रुग्ण आढळून आले आहेत.

दोन रुग्ण पूर्ण पणे बरे झाले…

महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे एकूण 21 रुग्ण आहेत. (Delta Plus Variant In Maharashtra)त्यापैकी दोन रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याची माहिती मिळाली आहे. दिलासा देणारी ही बातमी असली तर भविष्यात त्याचा धोका वाढण्याची भीती व्यक्ती केली जात आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटची लागण झालेल्या एका रुग्णाचं वय 70 वर्षे आहे. तर एक महिला रुग्ण असून ती दूध विक्रेत्याची पत्नी आहे. एक इलेक्ट्रिशन असून तो काही दिवसांपूर्वी मोठ्या विवाह सोहळ्यात सहभागी झाल्याची माहिती मिळाली आहे. दोन ज्वेलर्स असून ते काही दिवसांपूर्वी गुजरातमधील सुरत येथे गेले होते. तर एका शिक्षकाला देखील कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण झाली आहे.

दरम्यान, झपाट्यानं पसरणारा डेल्टा व्हेरिएंटचं रुपांतर आता डेल्टा प्लसमध्ये झालं आहे. तमिळनाडू पाठोपाठ आता महाराष्ट्र, पंजाब, केरळ आणि मध्य प्रदेशात देखील त्यांच संक्रमण वाढत आहे. डेल्टाचा संक्रमनाचा वेग नेमका किती आहे, याचा शोध घेतला जात आहे. मध्य प्रदेशातील शिवपुरीमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे.