नवी दिल्ली : देशासह राज्यामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा (Second Wave Of Corona) प्रभाव कमी होत चालला आहे. कोरोना रुग्णांची संख्या (Corona Patient) आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. ही दिलासादायक बाब असताना डेल्टा प्लस व्हेरिएंटने (delta plus variant) पुन्हा सर्वांच्या चिंतेत वाढ केली आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटने पुन्हा डोकं वर काढले आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटचा प्रादुर्भाव वाढत चालल्यामुळे या विषाणूने सरकारसह जनतेची चिंता वाढवली आहे. ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे (Corona Vaccine) दोन्ही डोस घेतले आहेत अशांना देखील डेल्टा प्लस व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. अशामध्ये राज्यात 88 टक्के रुग्णांना डेल्टा प्लस व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.Also Read - Breaking News Live Updates: राज्यात सध्यातरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत नाही; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

इंडियन सार्स-कोव-2 जिनोमिक कन्सॉर्शिया (INSACOG) रविवारी डेल्टा प्लस व्हेरिएंटसंदर्भात नुकताच केलेल्या एका अभ्यासाने सर्वांना हैराण केले आहे. सर्वात जास्त चिंता वाढवणारी बाब महाराष्ट्रासाठी (Maharashtra) आहे. कारण महाराष्ट्रात जुलै महिन्यात 88 टक्के रुग्णांना बी.1.617.2 स्वरुपाच्या विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळून आले होते. ऑगस्टमध्येही हा कल तसाच दिसून आला. 28 प्रयोगशाळांकडून तपासण्यात आलेल्या 51,996 नमुन्यांपैकी 11,968 नमुने एकट्या महाराष्ट्रातील होते. Also Read - Monsoon Update: राज्यात उद्यापासून पुढचे चार दिवस विजांच्या कडकाटासह मुसळधार पाऊस!

डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण इतर राज्यात देखील आहेत. पण याचा सर्वात जास्त संसर्ग महाराष्ट्रातील लोकांना झाल्याने चिंता वाढली आहे. महत्वाचे म्हणजे कोरोना प्रतिबंधक लसीचे (Corona Vaccination) दोन्ही डोस घेतलेल्या लोकांनाही याचा संसर्ग होत असल्याचे आरोग्य आणि विज्ञान- तंत्रज्ञान मंत्रालयाने सांगितले आहे. इंडियन सार्स-कोव-2 जिनोमिक कन्सॉर्शियाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, डेल्टा प्लस व्हेरिएटंचे केरळमध्ये (Keral) 5,554 रुग्ण, दिल्लीत (Delhi) 5,354 रुग्ण, ओडिशामध्ये (Odisha) 2,511 रुग्ण आणि पंजाबमध्ये (panjab) 2071 रुग्ण आढळले आहेत. गोवा आणि हरियाणात (Haryana) डेल्टा प्लस व्हेरिएंटचा एकही रुग्ण आढळला नाही. डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे आता पुन्हा सरकारची चिंता वाढली आहे. Also Read - Corona Vaccine: पालकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपासून 12 ते 17 वयोगटातील मुलांना मिळणार कोरोना प्रतिबंधक लस!