मुंबई: आषाढ शुक्ल पक्षाच्या एकादशीला देवशयनी एकादशी (Devshayani Ekadashi 2021) म्हणतात. देवशयनी एकादशीचे व्रत खूप प्रभावी मानले जाते. भगवान विष्णूचा निद्रा कालावधी देवशायनी एकादशीच्या (Devshayani Ekadashi 2021) दिवसापासून सुरू होतो, म्हणूनच त्याला देवशयनी एकादशी म्हणतात. देवशयनी एकादशीला पद्म एकादशी, आषाढी एकादशी ( Ashadhi Ekadashi 2021) आणि हरिशयनी एकादशी (Harishayani Ekadashi2021) असेही म्हणतात. देवशयनी एकादशी प्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेनंतर (Jagannath Ratha Yatra) येते. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार देवशयनी एकादशीचे व्रत (Devashyani Ekadashi vrat) दरवर्षी जून किंवा जुलै महिन्यात येते.Also Read - Kharmas 2021 Date: या दिवसापासून सुरू होतोय 'खरमास', महिनाभर थांबणार शुभ कार्य

देवशायनी एकादशीच्या चार महिन्यांनंतर भगवान विष्णू प्रबोधिनी एकादशीला जागी होतात. हिंदु दिनदर्शिकेनुसार चार महिन्यांचा आत्मसंयम कालावधी असलेल्या चातुर्मास देवशयनी एकादशीपासून सुरू होतो. यावर्षी देवशयनी एकादशी 20 जुलै 2021 रोजी आहे. Also Read - Chaturmas Starting From Today: आजपासून चातुर्मास प्रारंभ; जाणून घ्या काय आहे मान्यता

देवशयनी एकादशीचे महत्व

भगवान विष्णू योग निद्रेत गेल्यानंतर चार महिन्यांपर्यंत मांगलिक कार्य केले जात नाही. निसर्गात या चार महिन्यांत सूर्य, चंद्र आणि निसर्गाचं तेज कमी राहते. या काळात शुभ शक्ती कमकुवत असतात. त्यामुळे केलेल्या कार्याचे परिणाम देखील शुभ प्राप्त होत नाहीत. म्हणूनच या चार महिन्यांत म्हणजेच चतुर्मासात संत आणि महात्मे एकाच ठिकाणी राहतात आणि जप, तपश्चर्या व पूजा अर्चना करतात. असे मानले जाते की चातुर्मासात सर्व धाम ब्रज येथे येतात. त्यामुळे या काळात ब्रज यात्रा खूप शुभ माणली जाते. Also Read - Devashyani Ekadashi Importance: आजपासून थांबतील सर्व शुभ कार्ये; जाणून घ्या देवशयनी एकादशीचे महत्त्व

देवशयनी एकादशी 2021 शुभ मुहूर्त (Devshayani Ekadashi 2021 Timings)

देवशयनी एकादशी मंगळवार 20 जुलै 2021 रोजी आहे.
एकादशी आरंभ तिथी – 19 जुलै 2021 रोजी रात्री 9:59 वाजता
एकादशी समाप्ती तिथी – 20 जुलै 2021 रोजी सायंकाळी 07:17 वाजता
पारण तिथीच्या दिवशी द्वादशी समाप्तीची वेळ – सायंकाळी 04:26 वाजता

द्वादशीलाच व्रत पारण करणे महत्त्वाचे (Devshayani Ekadashi 2021)

एकादशीच्या व्रताच्या समाप्तीला पारण म्हणतात. एकादशीचे व्रताच्या पुढील दिवशी सूर्योदयानंतर पारण केले जाते. द्वादशीची तिथी संपण्यापूर्वी एकादशी व्रताचे पारण करणे फार महत्वाचे आहे. जर सूर्योदयाच्या अगोदर द्वादशी तिथी संपली असेल तर एकादशी व्रताचे पारण सूर्योदयानंतरच होते. द्वादशी तिथीमध्ये पारण न करणे हे पाप करण्यासारखे आहे.