नवी दिल्ली : देशामध्ये कोरोनाची दुसरी लाट (Second Wave of Corona) हळूहळू ओसरत चालली आहे. दुसरी लाट संपत नाही तोपर्यंत येत्या दोन ते चार आठवड्यात तिसरी लाट (Corona Third Wave) येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसंच तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेपेक्षा जास्त धोकादायक असेल असं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. पण अशामध्ये इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) एक दिलासादायक माहिती दिली आहे. कोरोनाची तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेइतकी भीषण नसेल असा निष्कर्ष आयसीएमआरने एका अभ्यासातून (Study) काढला आहे. त्यामुळे सर्वांना दिलासा मिळाला आहे.Also Read - New Covid Variant Detected : सावधान! देशात कोरोनाची चौथी लाट? नवा BA 2.75 व्हेरिएंट आढळला

सध्या देशामध्ये कोरोनाचा आणखी एक प्रकार असलेल्या डेल्टा प्लस विषाणूमुळे (Delta Plus Variant) भीतीचे वातावरण आहे. देशामध्ये डेल्टा प्लसचे 48 रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे केंद्र सरकारसोबत (Central Government) सर्व राज्य सरकारच्या (State Government) चिंतेत वाढ झाली आहे. याच दरम्यान कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दल आयसीएमआरने दिलेल्या निष्कर्षामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे. आयसीएमआरने लंडनच्या इम्पेरियल कॉलेजच्या (Imperial College London) सहकार्याने हा अभ्यास केला आहे. Also Read - Maharashtra Government: 'हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा'; उद्धव ठाकरेंचे शिंदे सरकारला आव्हान!

आयसीएमआरने गणिती प्रारुपांच्या आधारे कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या स्वरुपाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. त्या अभ्यासाच्या निष्कर्षांवर आधारित लेख इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च (Indian Journal of Medical Research) या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाला आहे. कोरोनाची तिसरी लाट कोणत्या कारणांमुळे येऊ शकते याचा विचार या अभ्यासात करण्यात आला आहे. आयसीएमआरच्या साथ व संसर्गजन्य आजार विभागाचे प्रमुख डॉ. समीरण पांडा यांनी सांगितले की, ‘कोरोना लसीकरणाची मोहीम (Corona Vaccination) वेगाने राबवली आणि लॉकडाऊनसारख्या (Lockdown) उपायांमुळे तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यास मदत होऊ शकते.’ Also Read - 'हा वाद आता पुरे, लवकरात लवकर Metro 3 सुरु करा', Sumeet Raghavan चा नव्या सरकारच्या निर्णयाला पाठिंबा!