नवी दिल्ली : देशावर कोरोनाचे (Coronavirus) मोठे संकट आहे. कोरोनाची दुसरी लाट (Second Wave of corona) हळूहळू ओसरत चालली आहे. पण येत्या दोन ते चार आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट (Third Wave of Corona) येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. अशामध्ये लहान मुलांच्या बाबतीत सरकार आणि पालक दोघांच्याही चिंतेत वाढ झाली आहे. लहान मुलांना कोरोनाचा फटका बसायला नको त्यामुळे गेल्या वर्षापासून शाळा बंद आहेत. पण अशामध्ये जर मुलांच्या शाळा (School) सुरु करुन त्यांना बाहेरचे जग दाखवायचे असेल तर आधी त्यांना लस (Corona vaccine) देणे हाच एक पर्याय आहे, असे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले आहे.Also Read - Ajit Pawar Corona Positive : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण, ट्वीट करत म्हणाले...

डॉ. रणदिप गुलेरिया यांनी पुढे सांगितले की, ’12 ते 18 वयोगटातील मुलांवर सप्टेंबरमध्ये कोव्हॅक्सिन लसीचे जे प्रयोग करण्यात आले, त्याचे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांचे निष्कर्ष हाती येतील. औषध नियंत्रकांनी मंजुरी दिल्यानंतर मुलांना लस उपलब्ध होईल. मुलांसाठी फायझर आणि ‘झायडस कॅडिला’ लसींचे पर्याय आहे.’ तसंच, शाळा सुरू करण्याआधी मुलांचे लसीकरण करणे बंधनकारक असल्याचे देखील त्यांनी सांगितले. Also Read - Rohit Sharma Tested Covid Positive: इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीपूर्वी कर्णधार रोहित शर्माला कोरोनाची लागण

देशात सध्या 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण (Vaccination) केले जात आहे. अशामध्ये 18 वर्षांखालील मुलांचे लसीकरण कधी होणार असा प्रश्न विचारला जात आहे. याच दरम्यान केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता 12 ते 18 वयोगटातील मुलांना लवकरच कोरोनाची लस मिळणार आहे. या मुलांसाठी लवकरच ‘झायडस कॅडिला’च्या लसीला (zydus cadila vaccine) मंजुरी देण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाला (Supreme Court) सांगितले आहे. तसंच, झायडस कॅडिलाच्या लसीचे 12 ते 18 वयोगटातील मुलांवरील वैद्यकीय चाचणी (Medical test) पूर्ण झाली आहे. भविष्यात ही लस या मुलांसाठी उपलब्ध होणार असल्याचे देखील केंद्र सरकारने (Central Government) या पत्रात स्पष्ट केले. Also Read - Corona Vaccine for Children: आनंदवार्ता! 7 ते 11 वयोगटातील मुलांचे लवकरच लसीकरण, या लसीच्या वापराला मिळाली मंजुरी

दरम्यान, देशामध्ये 12 ते 18 वयोगटातील मुलांची संख्या 13 ते 14 कोटी एवढी आहे. त्यामुळे या मुलांसाठी २५ ते २६ कोटी लसमात्रा लागतील. कोव्हॅक्सिन आणि झायडस कॅडिलाच्या लसीच्या चाचण्याही मुलांवर चालू आहेत. झायडस कॅडिलाच्या (zydus cadila) लसीला परवानगी मिळाल्यानंतर मुलांना ती लस देण्याबाबत निर्णय घेतला जाईल. असं स्पष्टीकरण नीती आयोगाचे आरोग्य सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिलं आहे.