DRDO Recruitment 2022: DRDOत अॅप्रेंटीस पदासाठी भरती, 3 मार्चच्या आधी असा करा अर्ज!
DRDO Recruitment 2022 : अॅप्रेंटीस भरतीसाठी डीआरडीओ नोटिफिकेशन जारी केले आहे. एकूण 17 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. 3 मार्च ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

DRDO Recruitment 2022: सरकारी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्हाला जर डीआरडीओमध्ये करिअर करायचे (career in DRDO) असेल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. अॅप्रेंटीस (Apprentice) भरतीसाठी डीआरडीओ नोटिफिकेशन जारी केले आहे. एकूण 17 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी उमेदवाराकडे मान्यता प्राप्त संस्था किंवा विद्यापीठाची बी.ई, बी.एससी, बी.टेक, डिप्लोमा, इंजिनिअरिंग, किंवा इतर पदवी असणे गरजेचे आहे. अर्ज प्रक्रिया सुरु असून उमेदवारांनी डीआरडीओची अधिकृत वेबसाईट https://rac.gov.in/ वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. पात्र उमेदवार 3 मार्च 2022 पर्यंत या पदांसाठी अर्ज करू शकतात.
Also Read:
पदाचा तपशील –
नोकरी – DRDO भरती
पदाचे नाव – अॅप्रेंटीस
पदाची एकूण संख्या – 17
श्रेणी – केंद्र सरकारची नोकरी (Central Govt jobs)
महत्वाच्या तारखा –
अर्ज प्रक्रिया सुरु – 16 फेब्रुवारी 2022
अर्ज करण्याची अंतिम मुदत – 3 मार्च 2022
पगार –
निवड झालेल्या उमेदवारांना 8000 ते 9000 रुपये प्रतिमहिना पगार मिळेल.
शैक्षणिक पात्रता…
या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा बी.ई, बी.एससी, बी.टेक, डिप्लोमा, इंजिनिअरिंग किंवा इतर क्षेत्रातील पदवीधर असावा. तसेच पदवी मान्यता प्राप्त संस्था किंवा विद्यापीठाची असावी. अधिक माहितीसाठी पात्र उमेदवारांनी DRDO च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
काय आहे डीआरडीओ –
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजे DRDO. ही एक भारतीय संघटना आहे. या संघटनेचे काम भारतीय संरक्षण क्षमतेला अधिक मजबूत करणे आणि संरक्षण क्षेत्रात संशोधन करणे आहे. या क्षेत्रात DRDO चे मोठे योगदान आहे. या संघटनेची स्थापना 1958 साली करण्यात आली. ही संस्था देशाच्या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत काम करते. DRDO ची स्थापना ही सुरुवातीला प्रयोगशाळांच्या लहान लहान संघटनांना सोबत घेत झाली होती. सध्या या संघटनेच्या 51 प्रयोगशाळा सुरु आहे. ज्या इलेक्ट्रॉनिक उपकरणे, देशाच्या सुरक्षेसंबंधी उपकरणे बनविणे आदी क्षेत्रात कार्यरत आहेत.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या