Top Recommended Stories

Droupadi Murmu Oath Ceremony: देशाला मिळाल्या 15 व्या राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मूनी घेतली राष्ट्रपती पदाची आणि गोपनियतेची शपथ!

Droupadi Murmu Oath Ceremony: द्रौपदी मुर्मू यांनी विरोधी पक्षांचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव करून विजयी झाल्या होत्या. त्यांनी ही निवडणूक जिंकून इतिहास रचला आहे. द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती होणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला ठरल्या आहेत.

Updated: July 25, 2022 11:56 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

देशाला मिळाल्या 15 व्या राष्ट्रपती
देशाला मिळाल्या 15 व्या राष्ट्रपती

Droupadi Murmu Oath Ceremony : भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती (President of India) द्रौपदी मुर्मू यांनी आज देशाच्या 15 व्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. द्रौपदी मुर्मूंनी (Draupadi Murmu) आज राष्ट्रपती पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी सोहळा नुकताच संपन्न झाला. सकाळी साडेदहा वाजता संसद भवनात शपथविधी सोहळा पार पडला. भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमण्णा (N. V. Ramana) यांनी द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची आणि गोपनियतेची शपथ दिली.

द्रौपदी मुर्मू यांनी विरोधी पक्षांचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव करून विजयी झाल्या होत्या. त्यांनी ही निवडणूक जिंकून इतिहास रचला आहे. द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती होणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला ठरल्या आहेत. मुर्मू यांनी मतदारांसह खासदार आणि आमदारांच्या वैध मतांपैकी 64 टक्क्यांहून अधिक मते मिळवली आणि मोठ्या फरकाने निवडणूक जिंकली. त्या देशाच्या 15व्या राष्ट्रपती होणार आहेत. या निवडणुकीत मुर्मू यांना 6,76,803 मते मिळाली, तर सिन्हा यांना 3,80,177 मते मिळाली. स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या त्या पहिल्या आणि सर्वोच्च पद भूषवणाऱ्या सर्वात तरुण राष्ट्रपती असतील. तसेच त्या देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत.

You may like to read

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली.. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती एम. वैंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, मंत्रिपरिषदचे सदस्य, राज्यपाल, मुख्यमंत्री, राजनैतिक मिशनचे प्रमुख, संसद सदस्य आणि सरकारचे प्रमुख, नागरी आणि लष्करी अधिकारी या समारंभाला उपस्थित होते. दरम्यान, संसदेच्या सेंट्रल हॉलमधील समारंभाच्या समारोपाच्या वेळी द्रौपती मुर्मू (Droupadi Murmu) ‘राष्ट्रपती भवना’कडे रवाना होतील. तिथे त्यांना ‘इंटर-सर्व्हिस गार्ड ऑफ ऑनर’ (Inter-Service Guard of Honour) प्रदान केले जाईल आणि राष्ट्रपतींना शिष्टाचाराननसार सन्मान केला जाईल.

Also Read:

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.

?>