By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
ED ची मोठी कारवाई: Xiaomi कंपनीच्या बँक खात्यांमधील जमा 5551 कोटी रुपये केले जप्त
Ed Action Against Xiaomi: चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi वर ईडीने मोठी कारवाई केली आहे. शाओमीच्या बँक खात्यांमधील 5551.27 कोटी रुपये ईडीने जप्त केले आहेत. शनिवारी यासंदर्भात जारी केलेल्या निवेदनात ईडीन विदेशी मुद्रा व्यवस्थापन कायदा 1999 अंतर्गत ही कारवाई केल्याचे सांगितले आहे.

Ed Action Against Xiaomi: अंमलबजावणी संचालनालयाने (ED) स्मार्टफोन निर्माता चीनी कंपनी Xiaomi वर मोठी कारवाई केली आहे. ED ने शाओमी इंडिया प्राइवेट लिमिटेडच्या (Xiaomi India Pvt Ltd) बँक खात्यांमध्ये जमा असलेले 5551.27 कोटी रुपये जप्त ( Xiaomi’s bank accounts seized) केले आहेत. शनिवारी ईडीने ही कारवाई केली आहे. यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या निवेदनात कंपनीने केलेल्या फसवणुकीप्रकरणी विदेशी मुद्रा व्यवस्थापन कायदा, 1999 (Foreign Exchange Management Act 1999) अंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचे ईडीने सांगितले आहे.
हिंदी वेबसाइट अमर उजालाने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, Xiaomi कंपनी भारतात एमआय (MI) आणि रेडमी (Redmi) या नावाने स्मार्टफोनचा व्यवसाय करते. शनिवारी केलेल्या कारवाईबाबत माहिती देताना ईडीने सांगितले की Xiaomi India ही चीनस्थित Xiaomi समूहाची संपूर्ण मालकीची कंपनी आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये चीनी फर्मने परदेशात पाठवलेल्या कथित बेकायदेशीर रकमेच्या संदर्भात कंपनीविरुद्ध चौकशी सुरू करण्यात आली होती. यानंतर फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट (FEMA) संबंधित कलमांतर्गत खात्यांमधील ठेवी जप्त करण्यात आल्या आहेत.
ED has seized Rs.5551.27 Crore of M/s Xiaomi Technology India Private Limited lying in the bank accounts under the provisions of Foreign Exchange Management Act, 1999 in connection with the illegal outward remittances made by the company.
— ED (@dir_ed) April 30, 2022
Trending Now
रिपोर्टनुसार Xiaomi इंडियाने 2014 मध्ये देशात आपले कामकाज सुरू केले आणि 2015 पासून पैसे पाठवण्यास सुरुवात केली. कंपनीने तीन विदेशी कंपन्यांना रॉयल्टीच्या नावाखाली 5551.27 कोटी रुपयांचे परकीय चलन पाठवले. या कंपन्यांमध्ये Xiaomi ग्रुपच्या एका घटकाचे नाव देखील समाविष्ट आहे, तर इतर दोन कंपन्या अमेरिकन होत्या. रॉयल्टीच्या नावावर ही मोठी रक्कम शाओमी ग्रुपच्या संस्थांच्या सूचनेनुसार पाठवण्यात आली होती.
ED ने आपल्या निवेदनात म्हटले की Xiaomi India ने मोबाईल फोनचे उत्पादन आणि वितरणाची जबाबदारी सांभाळली आहे, मात्र या तीन परदेशी कंपन्यांकडून कधीही सेवा घेतली नाही. परंतु या कंपन्यांना पैसे नक्कीच पाठवले गेले. कंपनीने रॉयल्टीच्या नावाखाली एवढी मोठी रक्कम परदेशात पाठवली हे फेमाच्या कलम 4 चे थेट उल्लंघन आहे. कंपनीकडून परदेशात पैसे पाठवण्याबाबत बँकांना चुकीची माहितीही देण्यात आली होती, असे देखील ईडीने म्हटले आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या