Top Recommended Stories

EIL Recruitment 2022: इंजिनिअर्स इंडिया लिमिटेडमध्ये व्यवस्थापकीय पदांची भरती; आजपासून ऑनलाईन अर्ज सुरू

EIL Recruitment 2022: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारत सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांपैकी एक इंजिनिअर्स इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

Published: February 2, 2022 8:07 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

EIL Recruitment 2022: इंजिनिअर्स इंडिया लिमिटेडमध्ये व्यवस्थापकीय पदांची भरती; आजपासून ऑनलाईन अर्ज सुरू
EIL Recruitment 2022

EIL Recruitment 2022: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची (EIL Recruitment 2022) बातमी आहे. भारत सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांपैकी एक इंजिनिअर्स इंडिया लिमिटेडमध्ये (EIL) विविध पदांसाठी भरती प्रक्रिया (EIL Recruitment 2022) राबवण्यात येणार आहे. या भरतीअंतर्गत व्यवस्थापकीय पदांवर भरती करण्यात येणार आहे. EIL ने यासंदर्भात सविस्तर अधिसूचना जारी (EIL Recruitment 2022) केली आहे.

Also Read:

कंपनीतर्फे 2 फेब्रुवारी 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार (EIL Recruitment 2022) व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक आणि उपमहाव्यवस्थापक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. भरती प्रक्रियेत (EIL Recruitment 2022) निवड झालेल्या उमेदवारांची या पदांवर कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात येणार आहे.

You may like to read

जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

EIL भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कंपनीची अधिकृत वेबसाइट recruitment.eil.co.in ला भेट द्यावी. या ठिकाणी उमेदवार भरतीसाठी ऑनलाइन नोंदणी करू (EIL Recruitment 2022) शकतात. ऑनलाईन नोंदणीमध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे उमेदवार लॉग-इन करत संबंधित पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज केल्यानंतर उमेदवाराने अर्जाची सॉफ्ट कॉपी डाऊनलोड करून सेव्ह करून घावी. ही ऑनलाईन अर्ज प्रक्रिया (EIL Recruitment 2022) आज 2 फ्रेबुवारी 2022 पासून सुरु झाली असून 22 फेब्रुवारी ही अर्ज कारण्याची अंतिम तारीख आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

EIL ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार व्यवस्थापकीय पदांसाठी (EIL Recruitment 2022) उमेदवारने मान्याता प्राप्त विद्यापीठातून किमन 65 गुणांसह बीई, बीटेक, बीएससी इंजिनिअरिंग पदवी किंवा समकक्ष शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे संबंधित कामाचा किमान 8 वर्ष अनुभव (EIL Recruitment 2022) असावा. तसेच उमेदवाराचे वय 36 वर्षांपेक्षा जास्त नसावे. यासह वरिष्ठ व्यवस्थापक पदासांठी समान शिक्षणासह 12 वर्ष अनुभव आणि वय मर्यादा 40 हून अधिक नसावी. तर सहाय्यक महाव्यवस्थापक पदांसाठी (EIL Recruitment 2022) 16 वर्षांचा अनुभव आणि वयोमर्यादा 44 पर्यंत असावी. तर उपमहाव्यवस्थापक पदासाठी 19 वर्षाचा अनुभव आणि उमेदवाराचे वय (EIL Recruitment 2022) जास्तीत जास्त 47 वर्ष असावे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 2, 2022 8:07 PM IST