नवी दिल्ली: देशात कोरोनाव्हायरसनं थैमान घातलं (Coronavirus Outbreak) असताना पश्चिम बंगालसह 5 राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. बंगालमध्ये 29 एप्रिलला अंतिम टप्प्यात मतदान होणार आहे. 2 मे रोजी मतमोजणी अर्थात निकाल जाहीर होणार आहे. अशातच केंद्रीय निवडणूक आयोगानं (Election Commission of India) मोठा निर्णय जाहीर केला आहे. बंगालसह पाचही राज्यात निवडणूक निकालानंतर विजयी मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. मद्रास हायकोर्टानं ( Madras High Court) फटकारल्यानंतर निवडणूक आयोगानं (Election Commission) हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.Also Read - Non-BJP CM's Meeting : मुंबईत होऊ शकते भाजपेतर मुख्यमंत्र्यांची बैठक, शिवसेना खा. संजय राऊत यांची माहिती

मद्रास हायकोर्टानं सोमवारी निवडणूक आयोगांची चांगलीच कानउघाडणी केली होती. देशात कोरोनाच्या बिघडलेल्या परिस्थितीवरून हायकोर्टानं निवडणूक आयोगाला फटकारलं. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेसाठी निवडणूक आयोग जबाबदार आहे. येत्या 2 मे रोजी मतमोजणी (Election Result) आहे. या दिवशी कोविड प्रोटोकॉल बनवण्यात यावेत आणि त्याचं तंतोतंत पालन व्हायला हवं. असं झालं नाही तर मतमोजणी पुढे ढकलावी लागेल, असा सज्जड इशारा मुख्य न्यायाधीश संजीव बनर्जी तथा न्यायमूर्ति सेंथिलकुमार राममूर्ति यांच्या न्यायपीठानं दिला होता. ‘बेजबाबदार संस्था’, अशी टिप्पणी देखील हायकोर्टानं दिली होती. त्यानंतर निवडणूक आरोगानं पश्चिम बंगालसह तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी आणि आसाममध्ये निवडणूक निकालानंतर विजयी मिरवणूक काढण्यास बंदी घातली. तसेच निकालानंतर विजयी उमेदवार प्रमाणपत्र घेण्यासाठी केवळ दोन व्यक्तींना घेऊन जावू शकतो, असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. Also Read - AAP Ka Punjab: मतदारांनी राखला भगवंत यांचा 'मान', पंजाबमध्ये प्रत्येक महिलेला महिन्याकाठी मिळणार हजार रुपये!

मद्रास हायकोर्टाने फटकारल्यानंतर निवडणूक आयोग (EC) कोरोना प्रोटोकॉलबाबत कठोर होताना दिसत आहे. 2 मे रोजी येणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निकालाबाबत त्यांनी आदेश दिला आहे. मतांच्या मतमोजणीच्या वेळी किंवा निकालानंतर कोणतीही मिरवणूक काढली किंवा साजरी केली जाणार नाही, असे त्यात नमूद केले आहे. निकालानंतर कोणताही उमेदवार आपले विजयी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी केवळ दोनच लोकांसह जाऊ शकतो. Also Read - Assembly Election 2022 Updates: UP, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये कोण पुढे-कोण मागे, जाणून घ्या एका क्लिकवर

दरम्यान, पश्चिम बंगालसह तामिळनाडू, केरळ, पुदुत्चेरी आणि आसाममधील विधानसभा निवडणुकांचे निकाल 2 मे रोजी जाहीर होणार आहेत. बंगालमध्ये 7 टप्प्यांत मतदान घेण्यात आलं. बंगालमध्ये 29 एप्रिलला अंतिम टप्प्यात मतदान होणार आहे.