लॉकडाऊनच्या काळात वाढीव वीज बिलांमुळे ग्राहक मेटाकुटीला आले होते. आता लॉकडाऊन उठल्यानंतर देखील वीज बिल कमी होण्याची नाव घेत नाही आहे. रिडिंग न घेता वीज कंपन्या बिल पाठवत असून ग्राहकांची लूट केली जात असल्याचा आरोप ग्राहकांकडून केला जात आहे. तुम्ही देखील वाढीव वीज बिलामुळे त्रस्त झाले असाल तर तुमच्यासाठी आम्ही 4 खाच टिप्स घेऊन आलो आहेत. या टिप्स फॉलो करून तुम्ही प्रत्येक महिन्याला मोठी बचत करू शकतात.Also Read - Rubina Dilaik Photo: TV वरील संस्कारी बहू झाली टॉपलेस, लाल गुलाब परिधान करून केले बोल्ड फोटोशूट

1. जुन्या बल्ब ऐवजी LED बसवा..

फिलामेंट असलेला बल्ब आणि सीएफएलमुळे विजेच्या जास्त वापर होतो. त्याऐवजी LED बल्ब बसवा. असं केल्यानं तुमचं वीज बिल तर कमी होईलच सोबतच घरात प्रकाश देखील जास्त पडेल. 100 होल्टचा फिलामेंट असलेला बल्ब 10 तासांत एक यूनिट वीज कन्झ्युम करतो. मात्र, कदाचित तुम्हाला माहित नसेल, की 15 व्हॅटचा सीएफएल 66.5 तासांत एक यूनिट वीज कन्झ्युम करतो. तर 9 व्हॅटचा एलईडी 111 तासांत एक यूनिट वीज कन्झ्युम करेगा. Also Read - Electricity Bill : ऊर्जा विभागाकडून थकित वीजबिलाची यादी जाहीर, या मंत्र्यांच्या नावावर आहे इतकी थकबाकी!

2. इलेक्ट्रिक वस्तू खरेदी करताना रेटिंगवर लक्ष द्या…

इलेक्ट्रॉनिक वस्तू त्यात फ्रिज, एअर कंडीशनर आदी खरेदी करताना रेटिंगवर विशेष लक्ष द्यायला हवे. 5 स्टार रेटिंग असलेल्याच वस्तू खरेदी करण्यावर भर द्यावा. या उत्पादनांची किंमत जास्त असते. परंतु त्यांना जास्त वीज लागत नाही. परिणामी वीज बिल देखील कमी येते. Also Read - Load Shedding In Maharashtra: भर उन्हाळ्यात नागरिकांना लोडशेडिंगचा फटका, वाचा कुठे-कुठे बत्ती गुल राहाणार

3. काम झाल्यानंतर लाईट, फॅन आणि AC बंद करायला विसरू नका…

बहुतेक वेळा असं होतं की, काम झाल्यानंतर देखील आपण लाईट, फॅन आणि AC सुरूच ठेवतो. खोलीत कोणीही नसतं तरी उपकरणं सुरूच राहतात. वीजेवर चालणाऱ्या वस्तू काम असेल तरच सुरू कराव्या. त्यामुळे विजेची मोठी बचत होईल. परिणामी बिल देखील कमी येईल.

4. 24 डिग्री टेम्परेचरवरच AC चालवा…

एअर कंडीशनर अर्थात AC कायम 24 डिग्री टेम्परेचरवरच चालवायला हवं. ते एक आयडियल टेम्परेचर आहे. वीज बिल कमी यावं म्हणून बहुतांश लोक ही टेक्निक फॉलो करतात. खोलीमध्ये गारवा कायम राहतो आणि त्याचा ताण खिशावर देखील पडत नाही. याशिवाय तुम्ही टाईमरचा देखील वापर करू शकतात. खोली गार झाल्यानंतर AC बंद करू शकतात. या टिप्स फॉलो करून तुम्ही 4 ते 6 हजार रुपयांची बचत करू शकतात.