By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Elon Musk Buy Twitter : Elon Musk च्या हाती लागली Twitter ची 'चिमणी', खरेदीसाठी लावली इतकी मोठी बोली!
Elon Musk Buy Twitter :टेस्ला कंपनीचे मालक एलॉन मस्क (Elon Musk ) यांनी मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटर (Twitter ) खरेदी केले आहे. ट्विटरचे संचालक आणि एलॉन मस्क यांच्यात 44 अब्ज डॉलरमध्ये हा व्यवहार पूर्ण झाला.

Elon Musk Buy Twitter : टेस्लाचे (Tesla) मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी बऱ्याच दिवसांपासून ट्विटरच्या (Twitter ) शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यानंतर आता थेट ट्विटर कंपनीच विकत (Elon Musk Buy Twitter ) घेतली आहे. 44 अब्ज डॉलर्समध्ये हा करार पार पडला आहे. सोशल मीडियावर अॅक्टिव असलेल्या एलॉन मस्क (Elon Musk ) यांनी ट्विटरमध्ये गुंतवणूक केल्यानंतर कंपनी विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. 54.20 डॉलर या दराने प्रति शेअर विकत घेण्याची ऑफर एलॉन मस्क यांनी ट्विटरला दिली होती. ही ऑफर ट्विटरच्या बोर्डाने सोमवारी उशिरा स्वीकारली. याबाबत एलॉन मस्क यांनी ट्वीट करत ट्विटर विकत घेतल्याचे जाहीर केले.
Also Read:
एलॉन मस्क हे गेल्या काही काळापासून सतत ट्विटरचे शेअर्स खरेदी करत होते. त्यानंतर त्यांनी थेट ट्विटरच्या संचालकांकडून ट्विटर विकत घेण्याची ऑफर दिली. यानुसार एलॉन मस्क यांनी प्रति शेअर 54.20 डॉलर प्रमाणे ट्विटर विकत घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता. हा आकडा 1 एप्रिल 2022 च्या स्टॉकच्या बंद दरापेक्षा 38 टक्के अधिक आहे. त्यावेळी ट्विटरमध्ये गुंतवणूक केलेले सौदी अरेबियाचे प्रिन्स अल वलीद बिन तलाल अल सौदी यांनी ट्विट करत एलॉन मस्क यांची ऑफर नाकारली होती. त्यानंतर आता ट्विटर बोर्डाला ही ऑफर पसंत पडत बोर्डाने ऑफर मान्य केली आहे. त्यामुळे आता एलॉन मस्क हे ट्विटरचे मालक झाले आहे. या संदर्भात पूर्ण प्रक्रिया ही वर्षभरात पूर्ण होईल. दरम्यान, सध्याचे ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल हे सीईओ म्हणून कायम राहतील की त्यांच्या सीईओ म्हणून दुसऱ्या कोणाची नियुक्ती होते हे अद्याप स्पष्ट नाही.
I hope that even my worst critics remain on Twitter, because that is what free speech means
— Elon Musk (@elonmusk) April 25, 2022
ट्विटरवरील टीका कायम राहतील
ट्विटर खरेदीच्या ट्विट व्यतिरिक्त एलॉन मस्क यांचे आणखी एक ट्विट देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. सोमवारी संध्याकाळी एलॉन मस्क यांनी हे ट्विट करत ‘मला अशा आहे की, त्यांच्या सर्वात वाईट टीका अजूनही ट्विटर राहतील, कारण यालाच बोलण्याचे स्वतंत्र्य म्हणतात त्यांचे हे ट्विट वेगाने व्हायरल होत आहे. एलॉन मस्क हे सोशल मीडियावर सक्रिय राहता आपले म्हणणे स्पष्टपणे मांडता. काहीवेळा त्याच्यावर टिकाकारांकडून टीका देखील केली जाते.