Top Recommended Stories

EPF E-Nomination : आत्ताच भरा ईपीएफचे ई-नॉमिनेशन, मिळेल 7 लाखांच्या विम्याचा फायदा आणि बरंच काही

EPF E-NOMINATION ONLINE: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ईपीएफ सदस्यांना विविध प्रकारचे फायदे देते. सध्याच्या अपडेटनुसार एपीएफओने आपल्या खातेधारकांना ई-नामांकन दाखल करण्यास सांगितले आहे. हे नामांकन आपल्या वारसांना आपल्या खात्याचा लाभ मिळवा यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

Updated: March 25, 2022 7:51 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

EPF E-Nomination : आत्ताच भरा ईपीएफचे ई-नॉमिनेशन, मिळेल 7 लाखांच्या विम्याचा फायदा आणि बरंच काही
EPF E-NOMINATION ONLINE

EPF E-NOMINATION ONLINE: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ईपीएफ सदस्यांना विविध प्रकारचे फायदे देते. सध्याच्या अपडेटनुसार एपीएफओने आपल्या खातेधारकांना ई-नामांकन (E-Nomination) दाखल करण्यास सांगितले आहे. हे नामांकन आपल्या वारसांना आपल्या खात्याचा लाभ मिळवा यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे पीएफ खातेधारक (PF account holder) आपले ई-नामांकन दाखल करून एपीएपओच्या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. नामांकन दाखल केलेले खातेधारक जलद ऑनलाइन सेवा आणि 7 लाख रुपयांपर्यंतचा विम्याचा लाभ (Insurance Benefit) घेऊ शकतात. “तुम्हाला ई-नामांकन दाखल करण्याचे फायदे माहिती नसतील तर ईपीएफओने नुकतेच ट्विट करून यासंदर्भातील सर्व तपशील शेअर केले आहेत. (fill EPF e-nomination now, get an insurance benefit of Rs 7 lakh and much more)

You may like to read

ईपीएफ ऑनलाइन ई-नामांकन करण्याचे फायदे (Advantages of EPF e-nomination filing)

  • सदस्याच्या मृत्यूवर ऑनलाइन दावा करणे आणि निकाली काढणे सोपे होते.
  • ईपीएफ ई-नामांकन भरसल्यास पेपरलेस आणि जलद क्लेम सेटलमेंटसाठी मदत होते.
  • पीएफ आणि पेन्शनचे ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी देखील याचा उपायोग होतो.
  • पात्र नामनिर्देशित व्यक्तींसाठी 7 लाख रुपयांपर्यंतचा विमा.

जानेवारी 2022 मध्ये 2.69 लाख अधिक सदस्य

श्रम आणि रोजगार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार “EPFO चा पेरोल डेटा 20 मार्च 2022 रोजी जारी करण्यात आला. त्यानुसार EPFO ​​ने जानेवारी 2022 मध्ये 15.29 लाख निव्वळ सदस्य जोडले आहेत. मासिक आधारावर डिसेंबर 2021 च्या तुलनेत जानेवारी 2022 मध्ये 2.69 लाख अधिक सदस्य जोडले गेले”. श्रम आणि रोजगार मंत्रालयानुसार महिन्याभरात जोडलेल्या एकूण 15.29 लाख निव्वळ सदस्यांपैकी EPF आणि MP कायदा 1952 च्या सामाजिक सुरक्षा कक्षेअंतर्गत प्रथमच सुमारे 8.64 लाख नवीन सदस्यांची नोंदणी झाली आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.