Good News: EPFO सदस्यांच्या खात्यात ट्रान्सफर झाली मोठी रक्कम, जाणून घ्या बॅलन्स कसा चेक करायचा!
EPFO ने सर्व ग्राहकांच्या खात्यात व्याजाची रक्कम ट्रान्सफर केली आहे.

EPFO Alert : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सर्व सदस्यांसाठी आनंदाची बातमी येत आहे. EPFO ने सर्व ग्राहकांच्या (EPFO Subscribers) खात्यात व्याजाची रक्कम ट्रान्सफर केली आहे. याचा फायदा 6 कोटींपेक्षा जास्त EPFOच्या कर्मचाऱ्यांना झाला आहे. 2021-22 या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) 22.55 कोटी पीएफ खातेधारकांच्या खात्यावर 8.50 टक्के दराने व्याज जारी केले आहे.
Also Read:
- EPS Pension Scheme: ईपीएस पेन्शन मर्यादा रद्द झाल्यास कर्मचार्यांना मोठा लाभ, निवृत्ती वेतनात होईल 333 टक्क्यांनी वाढ!
- EPS Pension Scheme: ईपीएस पेन्शन मर्यादा रद्द झाल्यास कर्मचार्यांना मोठा लाभ, निवृत्ती वेतनात होईल 333 टक्क्यांनी वाढ?
- EPFO: सावधान! पीएफ खातेधारकांची होऊ शकते ऑनलाईन फसवणूक, ईपीएफओने जारी केले अलर्ट
मिस्ड कॉलच्या माध्यमातून बॅलेन्स कसा चेक कराल –
जर तुम्ही पीएफ खातेधारक (PF Account Holder) असाल आणि तुमचा मोबाईल क्रमांक तुमच्या पीएफ खात्याशी जोडला गेला असेल तर तुम्ही UAN क्रमांकाशिवायही तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक माहिती मिळवू शकता. यासाठी EPFO खातेधारक 011-22901406 या क्रमांकावर मिस कॉल (Miss Call) करून त्यांच्या खात्यातील शिल्लक जाणून घेऊ शकतात. तुम्ही या नंबरवर मिस्ड कॉल करताच, तुमचा UAN नंबर आणि PF खात्यातील शिल्लक माहिती काही वेळात तुमच्या नोंदणीकृत नंबरवर पाठवली जाईल.
ईपीएफ खात्यातील रक्कम ऑनलाइन कशी तपासायची?
यसाठी सर्वप्रथम epfindia.gov.in या वेबसाइटवर लॉग इन करा
यानंतर तुमचा UAN नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड फीड करा
यानंतर समोर दिसलेल्या ई-पासबुकवर क्लिक करा
सर्व तपशील प्रविष्ट केल्यानंतर तुम्हाला एका नवीन पृष्ठावर नेले जाईल
आता ओपन मेंबर आईडीवर क्लिक करा
आता तुम्ही तुमच्या खात्यातील एकूण ईपीएफ शिल्लक पाहू शकता
उमंग अॅपद्वारे ईपीएफ शिल्लक कशी तपासायची?
सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनमध्ये उमंग अॅप उघडा
यामध्ये EPFO पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर Employee Centric Services वर क्लिक करा
यानंतर View Passbook पर्यायावर क्लिक करा
तुमचा UAN नंबर आणि पासवर्ड फीड करा
तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP मिळेल
आता तुम्ही तुमची EPF शिल्लक तपासू शकता
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या