नवी दिल्ली: ईपीएफ (EPF) कर्मचाऱ्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे कोणालाही सांगण्याची गरज नाही. ही एक प्रकारची गुंतवणूक आहे जी सरकारी किंवा बिगर सरकारी कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी केली जाते आणि ती त्यांच्या भविष्यासाठी उपयुक्त ठरते. EPF ACT 1952 नुसार 20 किंवा 20 पेक्षा जास्त कर्मचारी असणाऱ्या कंपन्यांनी EPFO ​​मध्ये (Employees’ Provident Fund Organisation) त्यांची नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे कर्मचाऱ्याने आपल्या पीएफबाबत नेहमी जागरूक असले पाहिजे. उदाहरणार्थ त्याचे पैसे खात्यात येत आहेत की नाही हे पाहणे फार महत्वाचे आहे. हे शोधण्याचा एक अतिशय सोपा मार्ग आहे.Also Read - PF Withdrawal Rule : पीएफ काढण्याच्या नियमांमध्ये बदल; मेडिकल इमरजन्सीसाठी काढू शकता 1 लाख रुपये अडव्हान्स

या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) जारी केलेल्या 011-22901406 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन तुम्ही तुमचे पीएफ बॅलेन्स तपासू शकता. तुम्ही या क्रमांकावर कॉल करता तेव्हा एका रिंगनंतर तुमचा फोन आपोआप डिस्कनेक्ट होईल आणि EPFO ​​द्वारे तुम्हाला बॅलेन्सचा संदेश पाठवला जाईल. Also Read - Labor Code Rules: खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! बेसिक सॅलरी वाढून 21 हजार रुपये होणार!

SMS द्वारे जाणून घ्या पीएफ बॅलेन्स

मिस्ड कॉल व्यतिरिक्त तुम्ही एसएमएस द्वारे देखील पीएफ बॅलेन्स तापासू शकता. पीएफ जाणून घेण्याचा हा आणखी एक सोपा मार्ग आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत फोन नंबरवरून 7738299899 वर ‘EPFOHO UAN LAN’ पाठवावा लागेल. यानंतर तुमच्या नोंदणीकृत फोन नंबरवर खात्याविषयी माहिती दिली जाईल. Also Read - Provident Fund: नोकरदार वर्गासाठी सरकारचं गिफ्ट; PF वर मिळणार जास्त व्याज; जाणून घ्या सविस्तर

उमंग अॅपच्या माध्यमातून जाणून घ्या पीएफ बॅलेन्स

पीएफ शिल्लक जाणून घेण्यासाठी उमंग अॅप हा एक चांगला पर्याय आहे. याद्वारे ग्राहक त्यांच्या पीएफ खात्याची माहिती मिळवू शकतात. यासाठी तुम्हाला उमंग अॅपच्या ईपीएफओ विभागात जावे लागेल. येथे तुम्ही कर्मचारी केंद्रित सेवांवर क्लिक करा. यानंतर View Passbook या पर्यायावर क्लिक करा. येथे पासबुक पाहण्यासाठी तुम्हाला यूएएन क्रमांकासह लॉग इन करावे लागेल. यानंतर तुमच्या फोन नंबरवर एक OTP येईल. तो प्रविष्ट केल्यानंतर तुमचे पासबूक दिसेल.

UAN च्या माध्यमातून जाणून घ्या पीएफ बॅलेन्स

पीएफ बॅलेन्स तपासण्यासाठी युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) अॅक्टिव्हेट क्रिय करणे आवश्यक आहे. तो अॅक्टिव्हेट केल्यानंतर कर्मचारी भविष्य निधी संघटनेची वेबसाइट epfindia.gov.in वर जा आणि तेथे पासबूक पर्यायावर क्लिक करा. येथे युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN), पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करा. यानंतर तुमचे EPF खाते उघडेल आणि डावीकडील सदस्य ID वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे पीएफ बॅलेन्स पाहता येईल.

UAN असा करा अॅक्टिव्हेट

EPFO ची वेबसाइट https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface ला भेट देऊन तुम्ही तुमचा UNN नंबर अॅक्टिव्हेट करू शकता. या लिंकवर तुम्हाला तुमचा UAN कसा सक्रिय करता येईल याची संपूर्ण माहिती मिळेल. याशिवाय तुम्ही ऑनलाइन जाऊन तुमच्या पीएफ खात्याची माहिती देखील मिळवू शकता. यासाठी ईपीएफओ वेबसाइट unifiedportal-mem.epfindia.gov.in ला भेट देऊ शकता.