EPFO Birth date Update: EPFO मध्ये ऑनलाइन अपडेट करा जन्मतारीख, येथे जाणून घ्या सोप्पी पद्धत
EPFO Online Birth date Update: ज्या EPFO सदस्यांकडे त्यांचा सक्रिय UAN क्रमांक आहे त्यांना त्यांच्या वैयक्तिक तपशीलांशी संबंधित अनेक बदल आणि अपडेट करण्याची परवानगी मिळते. भविष्य निर्वाह निधी संघटना सदस्यांना त्यांची जन्मतारीख बदलण्याची किंवा दुरुस्त करण्याची परवानगी देते.

EPFO Online Birth date Update: ज्या EPFO सदस्यांकडे त्यांचा सक्रिय UAN क्रमांक आहे त्यांना त्यांच्या वैयक्तिक तपशीलांशी संबंधित अनेक बदल आणि अपडेट करण्याची परवानगी मिळते. भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) सदस्यांना त्यांची जन्मतारीख बदलण्याची किंवा दुरुस्त करण्याची परवानगी देते. मात्र एकदा दिलेली जन्मतारीख/वय साधारणपणे बदलता येत नाही. तरी देखील पुरावा म्हणून योग्य कागदपत्रांचा वापर करून यात बदल केला जाऊ शकतो.
जन्मतारखेचा पुरावा म्हणून वापरावयाची कागदपत्रे
- जन्मतारखेतील अंतर 3 वर्षांपेक्षा कमी असल्यास युनिफाइड सदस्य पोर्टलवर आधार/ई-आधार सबमिट करा. तसेच जन्मतारखेत 3
- वर्षांपेक्षा जास्त फरक असल्यास युनिफाइड मेंबर पोर्टलवर खालीलपैकी कोणत्याही कागदपत्रांसह आधार/ई-आधार सबमिट करा.
- कोणतेही शाळा/शिक्षण प्रमाणपत्र
- जन्म आणि मृत्यू रजिस्ट्रारने जारी केलेले जन्म प्रमाणपत्र
- पासपोर्ट
- केंद्र/राज्य सरकारी संस्थांच्या सेवा रेकॉर्डच्या आधारे प्रमाणपत्र
- सरकारी विभागांद्वारे जारी केलेले कोणतेही विश्वसनीय कागदपत्रे जसे की ड्रायव्हिंग लायसन्स, ईएसआयसी कार्ड इत्यादी.
- सदस्याच्या तपासणीनंतर सिव्हिल सर्जनने दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्र
EPFO वेबसाइटवर जन्मतारीख कशी दुरुस्त करावी?
- EPFO UAN पोर्टलवर जा
- तुमचे लॉगिन तपशील, पासवर्ड आणि कॅप्चा कोड पंच करा
- ड्रॉप डाउन मेनूमधून, मूलभूत तपशील ‘मॅनेज करा’ आणि अपडेट पर्याय निवडा
- यानंतर तपशील बदलाची विनंती करा
- येथे तुम्हाला तुमचा आधार तपशील, तुमचे नाव, तुमची जन्मतारीख आणि तुमचे लिंग प्रविष्ट करावे लागेल.
- यानंतर आवश्यक बदल करा
- एकदा सबस्क्राइबरने आवश्यक ते तपशील बदल केल्यानंतर कर्मचारी आणि नियोक्ता यांना आधार, पॅन इत्यादी कागदपत्रांसह संबंधित
- ईपीएफ कार्यालयात एक संयुक्त विनंती सबमिट करावी लागेल.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या