EPFO E-Nomination: त्वरा करा! ई-नॉमिनेशन झाले अनिवार्य, अन्यथा तुम्ही पाहू शकणार नाही PF खात्यातील बॅलेन्स

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) खातेधारकांसाठी ई-नामांकन अनिवार्य केले आहे. खातेदार ई-नामांकनाशिवाय पीएफ पासबुक पाहू शकणार नाहीत. आत्तापर्यंत याची करण्याची आवश्यकता नव्हती. परंतु, आता पीएफ खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी ई-नॉमिनेशन अनिवार्य आहे.

Updated: January 11, 2022 3:02 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

EPFO

EPFO E-Nomination: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) खातेधारकांसाठी ई-नामांकन अनिवार्य केले आहे. खातेदार ई-नामांकनाशिवाय पीएफ पासबुक पाहू शकणार नाहीत. आत्तापर्यंत याची करण्याची आवश्यकता नव्हती. परंतु, आता पीएफ खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी ई-नॉमिनेशन अनिवार्य आहे. आतापर्यंत खातेदार ई-नामांकन न करताही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेच्या वेबसाइटवर जाऊन पीएफ शिल्लक आणि पासबुक सहज तपासू शकत होते.

Also Read:

ई-नॉमिनेशनसाठी भरावी लागेल ही माहिती

ईपीएफ खात्यात ई-नॉमिनेशनसाठी आधी नॉमिनीचे नाव द्यावे लागेल. नॉमिनी पत्ता आणि खातेदाराशी असलेले नाते नमूद करावे लागेल. नॉमिनीच्या जन्मतारखेसोबतच पीएफ खात्यात किती टक्के रक्कम जमा केली जाईल याची देखील माहिती द्यावी लागले. नॉमिनी अल्पवयीन असल्यास त्याच्या किवा तिच्या पालकाचे नाव आणि पत्ता देणे आवश्यक आहे. नामनिर्देशित व्यक्तीची स्वाक्षरी किंवा अंगठ्याचा ठसा आवश्यक आहे.

यासाठी नॉमिनेशन आवश्यक

कोणत्याही बचत योजना खात्याच्या बाबतीत नॉमिनेशन अनिवार्य आहे. यामुळे खातेदाराच्या मृत्यूनंतर त्याला ज्या व्यक्तीपर्यंत पैसे पोहोचवायचे होते त्याच्यापर्यंत पैसे पोहोचतात. EPF आणि कर्मचारी पेन्शन योजनेच्या बाबतीतही नॉमिनेशनर करणे आवश्यक आहे. यामुळे EPFO ​​सदस्याच्या अकाली मृत्यूनंतर नॉमिनी व्यक्तीला हा निधी वेळेत मिळण्यास मदत होते.

अशा पद्धतीने भरा ई-नॉमिनेशन

  • EPF सदस्य पोर्टलवर UAN आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.
  • मॅनेज सेक्शनमध्ये जा आणि ई-नॉमिनेशन पर्यायावर क्लिक करा.
  • प्रोफाइलमध्ये कायमस्वरूपी आणि तात्पुरता पत्ता प्रविष्ट करा आणि ‘सेव्ह’ बटणावर. क्लिक करा. तुम्हाला कुटुंब आहे की नाही हे देखील निवडा.
  • कुटुंबातील सदस्यांचे तपशील म्हणजे आधार क्रमांक, नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता, पालक (नॉमिनी अल्पवयीन असेल तर) अशी माहिती भरा आणि सेव्ह फॅमिली डिटेल्सवर क्लिक करा. तुम्ही याठिकाणी एकापेक्षा अधिक नॉमिनेशन देखील जोडू शकता.
  • कोणत्या नॉमिनीला किती टक्के रक्कम मिळेल हे देखील तुम्ही येथे नमूद करू शकता.
  • आधारचा व्हर्च्युअल आयडी एंटर करा आणि ‘व्हेरिफाय’ वर क्लिक करा.
  • आधार क्रमांक किंवा आधार व्हर्च्युअल आयडी टाकून ‘गेट ओटीपीवर’ क्लिक करा. यानंतर तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर एक OTP येईल.
  • EPFO मध्ये नॉमिनेशन पूर्ण करण्यासाठी OTP प्रविष्ट करा. त्यानंतर प्रत्यक्ष कागदपत्रे देण्याची गरज भासणार नाही.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 11, 2022 3:00 PM IST

Updated Date: January 11, 2022 3:02 PM IST