नवी दिल्ली: बचत खाते, मुदत ठेव किंवा बँक लॉकर या सर्व ठिकाणी नॉमिनीचे नाव नोंदणे आवश्यक असते. अन्यथा काही अनुचित घटनेमुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्याचप्रमाणे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खातेधारकांनाही त्यांच्या नॉमिनीचे नाव नोंदवणे आवश्यक आहे. EPF आणि EPS (कर्मचारी पेन्शन योजना) बाबतीतही नामांकन करणे आवश्यक असते. जेणेकरून EPFO ​​सदस्याचा काही कारणाने अकाली मृत्यू झाल्यास हा निधी त्याने नोंदवलेल्या नॉमिनीला वेळेत उपलब्ध केला जाऊ शकेल.Also Read - EPFO NEWS: कोट्यावधी सदस्यांना दिलासा, कोरोना संकट काळात दिली 'ही' सुविधा

7 लाख रुपयांची मिळते सुविधा

ईपीएफओ सदस्यांना एम्प्लॉईज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम (ईडीएलआय विमा कव्हर) अंतर्गत विमा संरक्षणाची सुविधा देखील मिळते. या योजनेत नॉमिनी असलेल्या व्यक्तीला जास्तीत जास्त 7 लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. जर सदस्य कोणत्याही नामनिर्देशनाशिवाय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर विमा क्लेम करण्याची प्रक्रिया कठीण होऊ शकते.

जाणून घेऊयात तुम्ही ऑनलाईन नॉमिनी नावनोंदणी तपशील कसा भरू शकता?

ई-नामांकन सुविधाही सुरू
ईपीएफओने आता नॉमिनी व्यक्तीची माहिती देण्यासाठी ई-नामांकन सुविधा सुरू केली आहे. याअंतर्गत ज्या लोकांनी नॉमिनीचे नाव नोंदवलेले नाही त्यांना संधी दिली जात आहे. यामुळे नॉमिनी असलेल्या व्यक्तीचे नाव, जन्मतारीख यासारखी माहिती ऑनलाइन अपडेट केली जाऊ शकते. (EPFO UPDATE: PF account holders update nominee immediately pf account holders must update nominee details otherwise you have to face difficulties )

ईपीएफ/ईपीएसमध्ये ई-नामांकन कसे करावे?
सर्वप्रथम ईपीएफओ वेबसाइटवर जा आणि ‘सर्व्हिस’ सेक्शनमध्ये ‘फॉर एम्प्लॉइज’ वर क्लिक करा.
आता ‘सदस्य यूएएन/ऑनलाइन सेवा (ओसीएस/ओटीसीपी)’ वर क्लिक करा.
आता UAN आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.
‘व्यवस्थापन’ टॅबमध्ये ‘ई-नामांकन’ निवडा.
त्यानंतर स्क्रीनवर ‘तपशील प्रदान करा’, एक टॅब दिसेल तेथे ‘सेव्ह’वर क्लिक करा.
कौटुंबिक घोषणा अद्ययावत करण्यासाठी ‘YES’ वर क्लिक करा.
त्यानंतर ‘Add Family Details’ वर क्लिक करा. याठिकाणी एकापेक्षा अधिक नॉमिनी जोडले जाऊ शकतात.
नॉमिनी करण्यासाठी ‘नामांकन तपशील’ वर क्लिक करा. तपशील प्रविष्ट केल्यानंतर, ‘ईपीएफ नावनोंदणी जतन करा’ वर क्लिक करा.
OTP जनरेट करण्यासाठी ‘ई-साइन’ वर क्लिक करा. आधारशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी पाठवला जाईल.
दिलेल्या जागी ओटीपी प्रविष्ट करून सबमिट करा.