By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
ESIC JOBS 2022: ईएसआयसीमध्ये विविध पदांसाठी मेगाभरती, आत्ताच करा अर्ज, जाणून घ्या पात्रता
ESIC SSO Notification 2022 Out: कर्मचारी राज्य विमा महामंडळाने सामाजिक सुरक्षा अधिकारी / व्यवस्थापक जीआर II / अधीक्षक पदांवर 93 जांगांवरील भरतीसंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. या पदांवर भरतीसाठी पदवीधर उमेदवार केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

ESIC SSO Notification 2022 Out: कर्मचारी राज्य विमा महामंडळाने सामाजिक सुरक्षा अधिकारी / व्यवस्थापक जीआर II / अधीक्षक पदांवर 93 जांगांवरील भरतीसंदर्भात अधिसूचना (ESIC SSO Notification) जारी केली आहे. या पदांवर भरतीसाठी पदवीधर उमेदवार केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. पात्र उमेदवारांची निवड विविध क्षेत्रांतील कार्यालयांसाठी प्राथमिक, मुख्य, संगणक कौशल्य चाचणी (ESIC Recruitment 2022) आणि वर्णनात्मक चाचणीद्वारे केली जाईल.
ESIC SSO भरती 2022 साठी (ESIC SSO Recruitment 2022) ऑनलाइन नोंदणी विंडो 12 मार्च 2022 ते 12 एप्रिल 2022 या कालावधीत https://www.esic.nic.in/ वर अॅक्टिव्हेट करण्यात आली आहे. ESIC ही भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या मालकीची विमा फर्म आहे आणि इएसआयसीचे देशभरात कार्यालये आहेत. सामाजिक सुरक्षा अधिकारी / व्यवस्थापक जीआर II / अधीक्षक पदासाठी ईएसआयसी एसएसओ (ESIC SSO Recruitment 2022) भरतीविषयी अधिक तपशील येथे पहा. जे उमेदवार ESIC SSO 2022 भरतीची वाट पाहत आहेत ते येथे दिलेल्या या लिंकवर https://www.esic.nic.in/attachments/recruitmentfile/137aadcd28fca627bf24b12befd88 थेट क्लिक करून अधिकृत अधिसूचना वाचू शकतात. निवड झालेल्या उमेदवारांना (ESIC SSO Salary) दरमहा रुपये 44,900 ते 1,42,400 रुपये पगार मिळेल.
आवश्यक पात्रता आणि वयोमर्यादा
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून कोणत्याही विषयातमधून पदवीधर असलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. उमेदवाराला संगणकावर काम करण्याचे ज्ञान आणि अनुभव देखील असणे आवश्यक आहे.
Trending Now
वयोमर्यादा : .या पदांसाठी असे सर्व उमेदवार अर्ज करू शकतात ज्यांचं वय 21 ते 27 वर्षे आहे. एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयात पाच वर्षे आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी तीन वर्षांची सूट असेल. 12 एप्रिल 2022 तारखेच्या आधारावर वयाची गणना केली जाईल.
ESIC SSO Recruitment 2022: परीक्षेचे तपशील
परीक्षा कोण आयोजित करेल: कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC)
पदाचे नाव: सामाजिक सुरक्षा अधिकारी / व्यवस्थापक जीआर II/अधीक्षक
पदांची संख्या: 93
नोकरी वर्ग: सरकारी नोकरी (Govt Jobs)
अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन
नोंदणी तारीख: 12 मार्च ते 12 एप्रिल 2022
परीक्षा पद्धत: ऑनलाइन
नोकरीचा प्रकार: थेट भरती
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण देशात
अधिकृत वेबसाइट: https://www.esic.nic.in/
परीक्षा तीन टप्प्यात होईल. प्राथमिक, मुख्य, संगणक कौशल्य चाचणी आणि वर्णनात्मक चाचणी असा तीन टप्प्यात परीक्षा आयोजित केली जाईल.
ESIC SSO 2022: महत्त्वाच्या तारखा
ESIC SSO अधिसूचना जारी झालेली तारीख : 11 मार्च 2022
ESIC SSO ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू : 12 मार्च 2022
ESIC SSO ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 एप्रिल 2022
अर्ज फी जमा करण्याची शेवटची तारीख: 12 एप्रिल 2022
अर्जाची प्रिंटआउट घेण्याची शेवटची तारीख: 27 एप्रिल 2022
प्रवेशपत्र (ESIC SSO Admit Card 2022) : अद्याप तारीख जाहीर केलेली नाही
फेज-1 परीक्षा (ESIC SSO Exam Date 2022) : सध्या तारीख जाहीर केलेली नाही
फेज-2 परीक्षा (ESIC SSO Exam Date 2022 Phase 2) : तारीख सध्या जाहीर केलेली नाही
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या