नवी दिल्ली: कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबाला दिलासादायक वृत्त आहे. सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) कोरोनामुळे मृत पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबाला आता नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला (NDMA) यासंदर्भात निर्देश दिले आहेत. कोविड-19 मुळे (Covid-19) आपला जीव गमावलेल्या मृतांच्या कुटुंबाला आर्थिक सहकार्य देण्यासाठी नवी मार्गदर्शकतत्त्वे जारी करण्याच्या सूचना देखील सुप्रीम कोर्टानं दिल्या आहेत.Also Read - Maharashtra Political Crisis : शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस, 2 दिवसांत मत मांडले नाही तर ठरणार अपात्र!

कोरोनाच्या महामारीमुळे देशात मोठ नुकसान झालं आहे. अनेकांनी तर आपला कुटुंबप्रमुखच गमावला आहे. अशा कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा कुटुंबांसाठी वित्त आयोगाच्या प्रस्तावानुसार विमा योजना तयार करण्यात यावी, असे निर्देश सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला दिले आहेत. Also Read - Gujarat Riots: गुजरात दंगलप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोठा दिलास, सुप्रीम कोर्टाने फेटाळली याचिका

सुप्रीम कोर्टानं सांगितलं की, कोविड-19 मुळे मृत पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबाला दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीची रक्कम निश्चित करावी. याबाबत नवी मार्गदर्शकतत्वे पुढील 6 आठवड्यात जारी करावी, असे निर्देश सुप्रिम कोर्टानं एनडीएमएला दिले आहेत. त्याचबरोबर कोविड-19 मुळे मृत्यू झालेल्या नागरिकांचं मृत्यु प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत देखील सुधारणा करणं गरजेचं असल्याचं सुप्रीम कोर्टानं सांगितलं. या संबंधित अधिकाऱ्यांना देखील मार्गदर्शक सूचना जाहीर करण्याचे कोर्टानं आदेश दिले आहेत. Also Read - Virat Kohli Corona Positive: टीम इंडियाची चिंता वाढली! विराट कोहलीला कोरोनाची लागण