By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Expensive Things In 2022: उद्यापासून तुमच्या खिशाला लागणार कात्री, या गोष्टींसाठी द्यावे लागणार जास्त पैसे!
Expensive Things In 2022: उद्या म्हणजेच 1 एप्रिल 2022 पासून अनेक वस्तूंच्या किमती वाढणार आहे. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे. महागाई आणखी वाढणार असल्यामुळे त्यांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या आर्थिक बजेटवर होण्याची शक्यता आहे.

Expensive Things In 2022 : 1 एप्रिलपासून नॅशनल हायवेवरुन (National Highway) प्रवास करणे महाग होणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने टोल टॅक्समध्ये (Toll Tax) 10 रुपये ते 65 रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सर्वसामान्यांना धक्का बसला आहे. त्यात आता 1 एप्रिलपासून बऱ्याच गोष्टी महाग होणार आहेत. चलनवाढ आणि सध्या सुरु असलेल्या पुरवठा साखळीच्या समस्येमुळे ग्राहक उपयोगी वस्तूंच्या किमती सतत वाढत आहेत. त्यातच आता उद्या म्हणजेच 1 एप्रिल 2022 पासून अनेक वस्तूंच्या किमती वाढणार आहे. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे. महागाई आणखी वाढणार असल्यामुळे त्यांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या आर्थिक बजेटवर (Budget 2022) होण्याची शक्यता आहे. त्यांचे महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. येत्या 1 एप्रिलपासून काय काय महाग होणार आहे ते आपण पाहणार आहोत….
Also Read:
- GST Rate Hike: आजपासून सर्वसामान्यांच्या खिशावर येणार ताण; अन्नपदार्थ, रुग्णालयातील उपचारासाठी मोजावे लागणार जास्त पैसे!
- GST Rate Hike: महागाईचा झटका! जीएसटीचे दर वाढवणार, 18 जुलैपासून 'या' वस्तू होणार महाग
- GST: सर्वसामान्यांना झटका! 18 जुलैपासून जेवणही महागणार, जाणून घ्या काय काय महागणार... संपूर्ण लिस्ट
– 1 एप्रिलपासून खाद्यपदार्थ महाग होण्याची शक्यता आहे. अंडी, मांस आणि दूध यासारखे पदार्थ महागणार आहेत. पण पुरवठा-साखळी आणि कामगार समस्यांमुळे कोकाकोला आणि पेप्सिकोलाने देखील किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे त्याच्या देखील किमती वाढवणार आहेत. त्याचसोबत ओरियो कुकीज, रिट्स क्रॅकर्स आणि सॉर पॅच किड्स 2022 हे देखील महाग होणार आहे.
– 1 एप्रिलपासून कपडे खरेदी करणे देखील महाग होणार आहे. सध्या अनेक दुकानदार हे कोरोना काळातील वॉर्डरोब्स खाली करत आहेत. मात्र पुरवठा साखळीच्या दबावामुळे किरकोळ किमती सरासरी 3.2 टक्क्यांनी वाढतील, असे मॅकिन्से बिझनेस ऑफ फॅशनच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. तर 15 टक्के फॅशन एक्झिक्युटिव्ह 2022 मध्ये 10 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त किमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
– 1 एप्रिलपासून हॉटेलवर जेवण करणे महाग होणार आहे. कोरोनाच्या काळापासून रेस्टॉरंट्सवर दबाव आहे. सध्या सुरु असलेली कर्मचारी आव्हाने लवकरच दूर होणार नाहीत. त्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट्स मालकांना अन्नासाठी अधिक पैसे देऊन कामगारांना आकर्षित करण्यासाठी वेतन वाढवावे लागले आहे. त्याचाच परिणाम मेनूच्या किमती सुद्धा वाढल्या आहे.
– 1 एप्रिलपासून घर खरेदी करणे देखील महागरणार आहे. 1 एप्रिलपासून केंद्र सरकार प्रथम घर खरेदी करणाऱ्यांना कलम 80EEA अंतर्गत कर सवलतीचा लाभ देणे बंद करणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी 1 फेब्रुवारी 2022 रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात 1 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या नवीन आर्थिक वर्ष 2022-23 पासून ही सुविधा वाढवण्यात येणार नसल्याचे सांगितले.
– 1 एप्रिलपासून वाहन खरेदी करणे देखील महागणार आहे. नवीन कारच्या किमती उच्चांकावर आहेत. त्यातच वापरलेल्या कार आणि ट्रकच्या किमती सुद्धा वाढल्या आहेत. त्यामुळे सर्व आर्थिक स्तरातल्या लोकांना याचे परिणाम भोगावे लागणार आहेत.