Employee Provident Fund: इंटरनेटशिवाय 2 मिनिटांत असा जाणून घ्या तुमचा PF बॅलन्स
Employee Provident Fund: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सर्व सदस्यांच्या खात्यावर केंद्र सरकारकडून (PM Modi Government) व्याज जमा (PF Interest Transfer) करण्यात आले आहे. केले आहे. त्यामुळे खात्यावरील जमा रक्कम (PF Balance) तपासण्यासाठी आम्ही आपल्यासाठी खास ट्रिक घेऊन आलो आहे.

Employee Provident Fund: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सर्व सदस्यांच्या खात्यावर केंद्र सरकारकडून (PM Modi Government) व्याज जमा (PF Interest Transfer) करण्यात आले आहे. केले आहे. त्यामुळे खात्यावरील जमा रक्कम (PF Balance) तपासण्यासाठी आम्ही आपल्यासाठी खास ट्रिक घेऊन आलो आहे. विशेष म्हणजे तुम्ही विना इंटरनेट (Internet Data) 2 मिनिटांत तुमचा PF बॅलन्स जमा करू शकतात. तुम्हाला केवळ एक मिस्ड कॉल (Miss Call) किंवा एसएमएस (SMS) करावा लागेल. मिस्ड कॉल केल्यावर तुम्हाला ईपीएफओकडून खात्यातील बॅलन्स संदर्भात एसएमएस प्राप्त होईल.
Also Read:
- EPS Pension Scheme: ईपीएस पेन्शन मर्यादा रद्द झाल्यास कर्मचार्यांना मोठा लाभ, निवृत्ती वेतनात होईल 333 टक्क्यांनी वाढ!
- EPS Pension Scheme: ईपीएस पेन्शन मर्यादा रद्द झाल्यास कर्मचार्यांना मोठा लाभ, निवृत्ती वेतनात होईल 333 टक्क्यांनी वाढ?
- EPFO: सावधान! पीएफ खातेधारकांची होऊ शकते ऑनलाईन फसवणूक, ईपीएफओने जारी केले अलर्ट
SMS द्वारा देखील जाणून घेऊ शकता माहिती…
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडे (EPFO) नोंदणी केलेल्या मोबाईल नंबरवरून 7738299899 वर ‘EPFO UAN LAN’ असा एसएमएस पाठवावा. ‘LAN’ म्हणजे आपली भाषा. तुम्हाला इंग्रजीत माहिती हवी असल्यास LAN च्या ऐवजी तुम्ही ‘ENG’ लिहावे. याच प्रकारे मराठीसाठी ‘MAR’ लिहावे. उदारणार्थ ‘EPFO UAN MAR’ असे लिहून मेसेज सेंड करावा.
मिस्ड कॉलद्वारा देखील जणू शकता डिटेल्स
EPFO खात्यातील जमा रक्कमेची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही मिस्ड कॉल देखील करू शकतात. यासाठी आपल्याला 011 22901406 या नंबरवर मिस्ड कॉल करावा लागेल.
ऑनलाईन देखील घेता येईल माहिती
EPFO खात्यातील रक्कम बघण्यासाठी आपण ऑनलाईन प्रक्रिया देखील करू शकतात. यासाठी EPFO पासबुक पोर्टलवर भेट देत पोर्टलवर आपला UAN आणि पासवर्डच्या सहाय्याने लॉगिन करावे. यात Download/View Passbook वर क्लिक करावे. त्यानंतर तुमच्या समोर पासबूक ओपन होईल.
उमंग अॅपचा करू शकता वापर
तुम्ही उमंग अॅपच्या मदतीने देखील पीएफ बॅलेन्स चेक करू शकतात. यासाठी उमंग अॅप ओपन करत EPFO वर क्लिक करावे. तुम्हाला Employee Centric service वर क्लिक करावे. त्यानंतर View Passbook वर क्लिक करत UNA आणि पासवर्ड टाकावे. त्यानंतर रजिस्टर मोबाईलवर OTP येईल. OTP टाकून तुम्ही EPF बॅलन्स बघू शकतात.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या