Top Recommended Stories

FIR Against Google CEO : गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या विरोधात मुंबईमध्ये गुन्हा दाखल!

FIR Against Google CEO : मुंबईतील एका कोर्टाच्या निर्देशानुसार गूगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि त्यांच्यासह अन्य पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Updated: January 27, 2022 12:00 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Sundar pichai
Sundar pichai

FIR Against Google CEO : गुगलचे सीइओ (Google CEO) सुंदर पिचाई यांच्या विरोधात मुंबईमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चित्रपट दिग्दर्शन सुनील दर्शन यांच्या तक्रारीवरून कॉपीराईट (Copyright) कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील दर्शन (Director Sunil Darshan) यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, गुगलने आपल्या अधिकृत व्यक्तींना त्यांचा चित्रपट ‘एक हसीना थी, एक दिवाना था’ यु-ट्युबवर (You Tube) अपलोड करण्याची अनुमती दिली होती.’ त्यांच्या या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दोन दिवसापूर्वच सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांना पद्म भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

Also Read:

कॉपीराईटच्या प्रकरणासंदर्भात (Copy Right Case) सुनील दर्शन यांनी कोर्टात धाव घेतली होती.  मुंबईतील एका कोर्टाच्या निर्देशानुसार गूगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि त्याच्यासह अन्य पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार अंधेरी पूर्व एमआयडीसी पोलिस ठाण्यात कॉपीराईट कायदा 1957 च्या कलम 51, 63 आणि 69 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाची चौकशी देखील सुरु करण्यात आली आहे. सुनील दर्शन हे बॉलिवूडचे (bollywood) प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. 2017 मध्ये त्यांचा ‘एक हसीना थी एक दिवाना था’ (Ek Hasina Thi Ek Diwana Tha Movie) हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. दर्शन यांना कोणतीही कल्पना न देता त्यांचा चित्रपट युट्युबवर अपलोड करण्यात आला आहे.

You may like to read

सुंदर पिचाई यांना मिळाले ‘पद्म भूषण’ –

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कार (Padma Bhushan) जाहीर केले. 128 जणांची नावं पुरस्कारासाठी जाहीर करण्यात आली होती. यातील 4 जणांना पद्म विभूषण पुरस्कार देण्यात आले. तिघांना मारोणोत्तर पुरस्काराने सन्मानित केले गेले. 17 जणांना पद्मभूषण तर 107 जणांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. गूगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला (Microsoft CEO satya Nadella) यांना पद्मभूषण पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.

काय म्हणाले सुनील दर्शन –

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, सुनील दर्शन म्हणाले की, ‘मी माझ्या चित्रपटाला अजूनपर्यंत कुठेच अपलोड केले नाही. तसेच कोणा चित्रपट विकला सुद्धा नाही. मात्र यु-ट्युबवर हा चित्रपट असून कोट्यवधी लोकांनी बघितला आहे. मी सतत विनंती करत आहे की, हा चित्रपट आपल्या प्लॅटफॉर्मवरून हटविण्यात यावा. मात्र त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही. कोणीतरी चुकीच्या मार्गाने चित्रपट अपलोड करून पैसे कमवीत आहे. त्यामुळे नाईलाजास्तव मला कोर्टात जावे लागले. कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. मी टेक्नॉलॉजीला चॅलेंज नाही करत परंतू टेक्नॉलॉजीचा हा चुकीचा वापर आहे.’

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 27, 2022 12:00 PM IST

Updated Date: January 27, 2022 12:00 PM IST