Top Recommended Stories

First Partial Solar Eclipse 2022 : यंदाचे पहिले खंडग्रास सूर्यग्रहण आज, जाणून घ्या कोण-कोणत्या भागात दिसणार!

First Partial Solar Eclipse 2022 : नासाच्या ( NASA ) म्हणण्यानुसार सूर्यग्रहण ( solar eclipse ) तेव्हाच होते जेव्हा चंद्रमा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो आणि पृथ्वीवर सावली टाकतो. या स्थितीत चंद्रमा सूर्याचा प्रकाश पूर्णपणे अडवून घेतो. आंशिक ग्रहण ( Partial Eclipse 2022 ) दरम्यान, चंद्रमा पूर्णपणे सूर्याला झाकू शकत नाही.  

Updated: April 30, 2022 8:02 AM IST

By India.com News Desk | Edited by Vikas Chavhan

Surya grahan 2022

First Partial Solar Eclipse 2022 : या वर्षभरात एकूण चार ग्रहण (Eclipse) होणार आहे. यात दोन सूर्य ग्रहण (Surya Grahan) तर दोन चंद्र ग्रहण (Chandra Grahan) असणार आहे. त्यानुसार पहिले ग्रहण ( First Partial Solar Eclipse 2022हे सूर्य ग्रहण असून 30 एप्रिल 2022 रोजी होईल. सूर्य ग्रहण दरम्यान सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर थेट पोहचत नाही.  सूर्य ग्रहण ही एक महत्त्वाची खगोलीय घटना आहे. ग्रहण हे ग्रह ताऱ्यांच्या गतीमुळे होत असते. 30  एप्रिल रोजी होणारे हे ग्रहण आंशिक सूर्य ग्रहण ( Partial Eclipse 2022आहे. चला तर मग जाणून घेऊया ग्रहणाची वेळा आणि कुठे दिसणार हे सुरु ग्रहण याबाबत सविस्तर.

Also Read:

या वर्षाचे पहिले सूर्य ग्रहण भारतीय वेळेनुसार 30 एप्रिलच्या माध्यरात्री म्हणजे 12 वाजून 15 मिनिटांनी सुरु होत ग्रहण पहाटे 4 वाजून 7 मिनिटांपर्यत राहील. हे आंशिक सूर्य ग्रहण असेल म्हणजेच चंद्र सूर्याच्या फक्त एकाच अंशाला बाधित करेल. हे पूर्ण सूर्य ग्रहण नसेल. नासाच्या म्हणण्यानुसार 30 एप्रिल रोजी ग्रहणाच्या दरम्यान, सूर्याच्या बिंबाचा 64 टक्के भाग चंद्रामुळे अवरोधित होईल. हे आंशिक ग्रहण असल्यामुळे चंद्र, सूर्य आणि पृथ्वी एका रेषेत नसतील. चंद्र आली काही अंशी सावली सूर्यवर पाडेल.

You may like to read

काय आहे आंशिक सूर्यग्रहण?

नासाच्या म्हणण्यानुसार सूर्यग्रहण तेव्हाच होते जेव्हा चंद्रमा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो आणि पृथ्वीवर सावली टाकतो. या स्थितीत चंद्रमा सूर्याचा प्रकाश पूर्णपणे अडवून घेतो. आंशिक ग्रहण दरम्यान, चंद्रमा पूर्णपणे सूर्याला झाकू शकत नाही. त्यामुळे सूर्य अर्धचंद्रावर अवस्थेत दिसतो.

भारतात दिसणार नाही ग्रहण

वर्षाचे पहिले सूर्य ग्रहण अंटार्टिका व्यतिरिक्त अटलांटिक क्षेत्र, प्रशांत महासागर, दक्षिण अमेरिकेच्या दक्षिण आणि पश्चिम भागात दिसेल. हे सूर्य ग्रहण भारतात दिसणार नाही. यामुळे आपल्या देशात या ग्रहणाचा धार्मिक प्रभाव मान्य राहणार नाही.

वर्षभरात चार ग्रहण

या वर्षभरात एकूण चार ग्रहण (Eclipse)) होणार आहे. यात दोन सूर्य ग्रहण (Surya Grahan) तर दोन चंद्र ग्रहण (Chandra Grahan) असणार आहे. त्यानुसार पहिले ग्रहण हे सूर्य ग्रहण असून 30 एप्रिल 2022 रोजी होईल. तर दुसरे सूर्य ग्रहण हे 25 ऑक्टोंबर 2022 रोजी आहे. यासह 16 मे 2022 रोजी पहिले चंद्राचे ग्रहण लागणार आहे. तर दुसरे चंद्र ग्रहण 8 नोव्हेंबर 2022 रोजी लागणार आहे. 

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: April 28, 2022 4:29 PM IST

Updated Date: April 30, 2022 8:02 AM IST