Top Recommended Stories

Flipkart Big Bachat Dhamaal Sale: iPhone 12 वर मिळतेय 25000 रुपयांची जबरदस्त सूट; जाणून घ्या काय आहे ऑफर

Flipkart Big Bachat Dhamaal Sale: ई-कॉमर्स कंपनी Flipkart वर 3 फेब्रुवारीपासून बिग बचत धमाल सेल (Big Bachat Dhamaal Sale) सुरु झाला आहे. 5 फेब्रुवारीपर्यंत हा सेल सुरू राहणार असून यात अनेक ब्रँण्डच्या स्मार्टफोनवर जबरदस्त सूट (Discount on branded phone) आणि (iPhone 12 price in India) आकर्षक ऑफर्ससह उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Updated: February 4, 2022 10:18 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Apple iPhone 12

Flipkart Big Bachat Dhamaal Sale: ई-कॉमर्स कंपनी Flipkart वर 3 फेब्रुवारीपासून बिग बचत धमाल सेल (Big Bachat Dhamaal Sale) सुरु झाला आहे. 5 फेब्रुवारीपर्यंत हा सेल सुरू राहणार असून यात अनेक ब्रँण्डच्या स्मार्टफोनवर जबरदस्त सूट (Discount on branded phone) आणि (iPhone 12 price in India) आकर्षक ऑफर्ससह उपलब्ध करून देण्यात आला आहे. सेलमध्ये iPhone 12 बेस्ट डीलमध्ये (iPhone 12 best deal) उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसार iPhone 12 वर सुमारे 25000 रुपयांची सूट मिळवू शकतात. तर मग जाणून घेऊ या ऑफर्सबाबत डिटेल्स…

Also Read:

iPhone 12 वर मिळतेय सूट

Flipkart Big Bachat Dhamaal अंतर्गत iPhone 12 च्या 128 GB स्टोरेज व्हेरिएंटवर 8 टक्क्यांची सूट देण्यात येत आहे.. त्यानुसार तुम्ही हा फोन 64,999 रुपयांत खरेदी करू शकतात. कंपनीने हा फोन70,900 रुपये किमतीत लॉन्च केला आहे. फोन घेण्यासाठी तुम्ही फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डने पेमेंट करत असाल तर तुम्हाला 5 टक्के अतिरिक्त म्हणजेच 3,250 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. म्हणजेच तुम्हाला हा फोन 61,749 रुपयांतच मिळेल.

You may like to read

अशी मिळावा 25000 रुपयांची सूट

तुम्हाला iPhone 12 वर 25000 रुपयांची सूट मिळवायची असेल तर तुम्ही सेलमध्ये मिळणाऱ्या ऑफर्सचा वापर करू शकतात. डिस्काऊंट आणि बँक ऑफर्सचा वापर केल्यास iphone 12 तुम्हाला 61,749 मध्ये मिळेल. म्हणजे यावर 9 हजार 151 रुपयांची सूट मिळत आहे. त्याचवेळी एक्सचेंज ऑफरनुसार तुम्ही 15,850 रुपयांची एकूण सूट मिळवू शकतात. त्यानंतर दोन्ही सूट मिळून 25,000 चा डिस्काऊंट मिळतो. दोन्ही ऑफर्सचा लाभ घेतल्यास iphone 12 फक्त 45,899 रुपयांत तुमच्या हातात येईल.

हे आहेत खास फीचर्स

iPhone 12 मध्ये दिलेल्या फीचर्सबाबत सांगायचे झाल्यास हा फोन A 14 बायोनिक चिपवर काम करतो. फोटोग्राफीसाठी यात 12MP प्लस 12MPचा ड्युअल रिअर कॅमेरा, सेल्फीसाठी 12MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. सोबतच 601 इंच सुपर रेटिना डिस्प्ले दिला आहे. हा फोन ड्युअल सिम सपोर्टसह येतो.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 4, 2022 10:14 PM IST

Updated Date: February 4, 2022 10:18 PM IST