Top Recommended Stories

Flipkart Electronics Sale: तुम्ही फक्त 2999 रुपयांत खरेदी करू शकता Samsung चा 23999 किमतीचा 5G Smartphone

ऑनलाइन शॉपिंग प्लेटफॉर्म फ्लिपकार्टवर (Flipkart) 27 मार्च अर्थात आजपासून फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक्स सेलला (Flipkart Electronics Sale) प्रारंभ झाला आहे. यात तुम्हाला स्मार्टफोन्स (Smartphones), स्मार्टवॉच (Smartwatch), लॅपटॉप (Laptop) आणि इअरफोन्स (Earphones) सारख्ये अनेक इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्स स्वस्तात मिळू शकतात.

Updated: March 27, 2022 6:37 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Flipkart Electronics Sale: तुम्ही फक्त 2999 रुपयांत खरेदी करू शकता Samsung चा 23999 किमतीचा 5G Smartphone

Flipkart Electronics Sale: ऑनलाइन शॉपिंग प्लेटफॉर्म फ्लिपकार्टवर (Flipkart) 27 मार्च अर्थात आजपासून फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक्स सेलला (Flipkart Electronics Sale) प्रारंभ झाला आहे. यात तुम्हाला स्मार्टफोन्स (Smartphones), स्मार्टवॉच (Smartwatch), लॅपटॉप (Laptop) आणि इअरफोन्स (Earphones) सारख्ये अनेक इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्स स्वस्तात मिळू शकतात. विशेष म्हणजे या सेलमध्ये 23,999 रुपये किंमत असलेला Samsung Galaxy F42 5G स्मार्टफोन तुम्ही फक्त 2,999 रुपयांत खरेदी करू शकतात. Flipkart Electronics Sale आजपासून सुरू झाला असून 31 मार्चपर्यंत सुरू असणार आहे.

सॅमसंगच्या 5G फोनवर मिळवा मोठा डिस्काउंट

Samsung Galaxy F42 हा 5G स्मार्टफोन 23999 रुपये किमतीत कंपनीने लॉन्च केला आहे. परंतु या स्मार्टफोनवर Flipkart Electronics Sale मध्ये मोठा डिस्काउंट मिळत आहे. 29% टक्के डिस्काउंटनंतर तुम्ही हा फोन 16999 रुपयांत खरेदी करू शकतात. तसेच CITI Bank च्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 1000 रुपये अतिरिक्त डिस्काउंट मिळेल. त्यानंतर या फोनची किंमत 15,999 रुपये होईल.

You may like to read

फक्त 3000 रुपयांत असा खरेदी करा 5G स्मार्टफोन

विशेष म्हणजे Samsung Galaxy F42 5G ला तुम्ही जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात देखील खरेदी करू शकतात. Flipkart Electronics Sale च्या एक्सचेंज ऑफरचा लाभ घेतल्यास तुम्हाला 13000 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळवू शकतात. त्यानुसार तुम्ही केवळ 2999 रुपयांत Samsung Galaxy F42 5G स्मार्टफोन घरी घेवून जाऊ शकतात.

जाणून घ्या Samsung Galaxy F42 5G फीचर्स

– 5G स्मार्टफोन
– 6GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज
– मीडियाटेक डायमेंसिटी 700 चिपसेटवर आधारित
– 6.6-इंचाचा फूल एचडी+ डिस्प्ले
– 5000mAh ची बॅटरी
– ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप
– मेन सेन्सर 64MP, दूसरा सेन्सर 5MP आणि 2MP चा तिसरा सेन्सर.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.