Top Recommended Stories

Flipkart Grand Gadget Days Sale मध्ये स्मार्टवॉच पासून ते इअरफोनपर्यंत विविध वस्तूंवर मिळतंय जबरदस्त डिस्काउंट

फ्लिपकार्ट ग्रँड गॅझेट डेज सेल लाइव्ह झाला असून 26 जानेवारीपर्यंत सुरू राहील. प्रजासत्ताक दिनानिमित्त सुरू झालेल्या या सेलमध्ये तुम्हाला अनेक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांवर सवलत आणि आकर्षक ऑफरचा लाभ घेण्याची संधी आहे.

Published: January 24, 2022 6:27 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Flipkart Grand Gadget Days Sale मध्ये स्मार्टवॉच पासून ते इअरफोनपर्यंत विविध वस्तूंवर मिळतंय जबरदस्त डिस्काउंट
Flipkart Grand Gadget Days Sale offers great discounts on everything from smartwatches to earphones

Flipkart Grand Gadget Days Sale : फ्लिपकार्ट ग्रँड गॅझेट डेज सेल लाइव्ह झाला असून 26 जानेवारीपर्यंत सुरू राहील. प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day Sale 2022) सुरू झालेल्या या सेलमध्ये तुम्हाला अनेक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांवर सवलत आणि आकर्षक ऑफरचा लाभ घेण्याची संधी आहे. तुम्ही नवीन स्मार्टवॉच, टॅबलेट, लॅपटॉप किंवा इअरफोन घेण्याचा विचार करत असाल (Best Deal on Laptop) तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी असू शकते. येथे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांवर 80 टक्के सवलतीचा लाभ घेण्याची संधी मिळत (Flipkart Sale) आहे. त्यामुळे उशीर न करता, सेलमध्ये सहभागी व्हा आणि स्वस्त दरात तुमचे आवडते उपकरण घरी घेऊन या.

फ्लिपकार्ट ग्रँड गॅझेट डेज सेलसाठी (Flipkart Grand Gadget Days Sale) ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टने एक डेडिकेटेड वेबपेज लाइव्ह केले आहे. या पेजवर सेल अंतर्गत उपलब्ध ऑफर आणि डिस्काउंटची माहिती देण्यात आली आहे. या सेलमध्ये तुम्ही TWS इयरफोन्स (TWS earphones ) 799 रुपयांपासून खरेदी करू शकता. तसेच जर तुम्ही स्मार्टवॉच खरेदी करण्याचा विचार करत असाल तर येथे तुम्हाला फायर-बोल्ट टॉक स्मार्टवॉच (Fire-Boltt Talk smartwatch) फक्त 2,999 रुपयांमध्ये मिळेल. तिची मूळ लॉन्च किंमत 4,999 रुपये आहे. याशिवाय तुम्ही फ्लिपकार्ट ग्रँड गॅझेट डेज सेलमध्ये 3,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह कॅमेरा देखील खरेदी करू शकता.

You may like to read

फ्लिपकार्ट ग्रँड गॅझेट डेज सेलमध्ये (Flipkart Grand Gadget Days Sale) तुम्हाला कमी किमतीत लॅपटॉप देखील मिळतील. सेलमध्ये डेल लॅपटॉपवर 30 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. The Nothing Ear 1 TWS earphones फक्त 5,499 रुपयांना उपलब्ध आहेत. याशिवाय तुम्हाला गेमिंगची आवड असेल तर Onikuma gaming headsets फक्त Rs.899 मध्ये मिळतील. सेल अंतर्गत, वापरकर्ते फक्त 199 रुपयांमध्ये HP mouse आणि कीबोर्ड देखील खरेदी करू शकतात.

याशिवाय सेलमध्ये Apple iPad (9th Gen) चे 64GB मॉडेल 30,990 रुपयांना विकत घेण्याची संधी आहे. त्याच वेळी Samsung Galaxy Tab A7 Wi-Fi वेरिएंट 15,999 रुपयांना उपलब्ध असेल. त्याची मूळ किंमत 17,999 रुपये आहे. जर तुम्हाला Apple AirPods खरेदी करायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला फक्त 10,999 रुपये खर्च करावे लागतील.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.