Top Recommended Stories

Fodder Scam: चारा घोटाळा प्रकरणी लालू यादव यांना 5 वर्षांची शिक्षा, 60 लाखांचा दंड

Fodder Scam News In Marathi: राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांना चारा घोटाळ्यात डोरंडा कोषागारातून 139.35 कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी 5 वर्षांचा तुरुंगवास आणि 60 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Published: February 21, 2022 3:18 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Lalu Prasad Yadav Education

Fodder Scam News In Marathi: राष्ट्रीय जनता दलाचे (Rashtriya Janata Dal) नेते लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांना चारा घोटाळ्यात डोरंडा कोषागारातून 139.35 कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी 5 वर्षांचा तुरुंगवास आणि 60 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय अन्य दोषींनाही तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 15 फेब्रुवारी रोजी सीबीआयच्या (सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन) विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती एसके शशी यांनी लालू यादव (Lalu Yadav) यांच्यासह शिक्षेवर सुनावणीसाठी आजची तारीख (21 फेब्रुवारी) निश्चित केली होती.

Also Read:

लालूंसह आणि इतर दोषींना सुनावली शिक्षा आणि दंड

लालू यादव यांना 5 वर्षांचा तुरुंगवास आणि 60 लाखांचा दंड, मो शहीदला 5 वर्षांचा तुरुंगवास आणि 1.5 कोटींचा दंड, महिंदरसिंग बेदीला 4 वर्षांचा तुरुंगवास आणि 1 कोटींचा दंड, उमेश दुबेला फक्त 4 वर्षांची शिक्षा, सत्येंद्र कुमार मेहराला 4 वर्षांची शिक्षा, राजेश मेहराला 4 वर्षांची शिक्षा, त्रिपुरारीला 4 वर्षांची शिक्षा, महेंद्र कुमार कुंदनला 4 वर्षांची शिक्षा, गौरी शंकरला 4 वर्षांची शिक्षा, जसवंत सहायला 3 वर्षांची शिक्षा आणि 2 लाख रुपये दंड, रवींद्र कुमारला चार वर्षांचा तुरुंगवास, प्रभात कुमारला 4 वर्षांचा तुरुंगवास, अजित कुमारला 4 वर्षांची शिक्षा आणि 2 लाखांचा दंड, बिरसा ओरावला 4 वर्षांची शिक्षा आणि 3 लाखांचा दंड, नलिनी रंजनला तीन वर्षांची शिक्षा.

You may like to read

मिळालेल्या माहितीनुसार, 38 दोषींव्यतिरिक्त 15 फेब्रुवारी रोजी इतर तीन दोषी न्यायालयात हजर राहू शकले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने तिघांविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते. शिक्षा सुनावण्यात आलेल्या 38 दोषींपैकी 35 बिरसा मुंडा तुरुंगात आहेत तर लालू प्रसाद यादव यांच्यासह इतर तीन दोषींना आरोग्याच्या कारणांमुळे राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये (RIMS) दाखल करण्यात आले आहे. कारागृह प्रशासनाने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व 38 दोषींना न्यायालयात हजर करण्याची व्यवस्था केली होती.

या प्रकरणी सीबीआयने एकूण 170 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. मात्र 26 सप्टेंबर 2005 रोजी 148 आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करण्यात आले होते. चारा घोटाळ्याच्या चार वेगवेगळ्या प्रकरणांत 14 वर्षांची शिक्षा भोगलेल्या लालूप्रसाद यादव यांच्यासह 99 जणांविरुद्धच्या प्रकरणात सर्व पक्षकारांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने 29 जानेवारी रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 21, 2022 3:18 PM IST